प्रतिबंधित कपाशी बियाणे व इतर मुद्देमाल केला जप्त.
गुजरात येथून बियाण्याची रसद.
यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील भारत सरकारने प्रतिबंधित केलेले अनधिकृत कपाशी बियाणे विक्री करता घेऊन येते असल्याची माहिती गोपनीय
बातमीदाराकडून मिळाली एका पांढऱ्या मारुती सुझुकी ईरटीका गाडी क्र.०३ सी बी ०६८१ हे बियाणे प्रतिबंधित केलेले असून अनाधिकृत कपाशी बियाणे विक्री करिता घेऊन येत असल्याचे माहिती दारव्हा येते मिळाली त्यानुसार पथकाने वरिष्ठानची परवानगी घेऊन तसेच कृषी विभागाचे अधिकारी व त्यांच्याकडे भरारी पथकासोबत घेऊन मिळालेल्या माहितीप्रमाणे दारव्हा दिग्रस रोडवरील केरला टायर रिमोट समोर सापळा रचून त्या येणाऱ्या गाडीला पोलीस पथकाने थांबून विचारणा केली असता व वाहनाची झडती सोबत असलेल्या कृषी अधिकारी व त्यांच्या भरारी पथकाने घेतली त्यामध्ये बुलंदी कॉटन हायब्रीड सीड्स ७७ पाटील एके ४७ कॉटन हायब्रीड सीड्स ७१ पॅकेट,एके ५६ कॉटन हायब्रीड सीड ६२ पाकीट त्रिनेत्र अनमोल कॉटन हायब्रीड सीड्स ७० पाकीट त्रिनेत्र शिवा कॉटन हायब्रीड सीड्स ७० पॅकेट असा एकूण ६ लाख ३० हजाराचे अनधिकृत कपाशी बियाणे मिळून आले यामध्ये शिवाजी आडे वय ३५ वेलोनी महागाव, नरेंद्र राठोड वय २८ महागाव, हिरासिंग राठोड वय ३२ महागाव,अवधूत जाधव पोखरी महागाव, नितीन पवार वय ४० महागाव,मोहन राठोड महागाव हे सर्व त्या वाहनांमध्ये होते. त्यांना विचारपूस केली असता हे बियाणे नरेंद्र मफपलाल पटेल उर्फ मंगलभाई पटेल वय ३५ रा.भाऊपुरा ताडी जि. मेसाना गुजरात यांच्याकडून विक्री करता आणले असल्याचे माहिती मिळाली हे कपाशी बियाणे अनधिकृत विक्री करता बाळगून त्यांच्या ताब्यातून तसेच वाहन व त्यांच्याकडील सहा मोबाईल फोन असा एकूण १६,९०,००० रुपयाचा मुद्देमाल जप्त करून पोलीस स्टेशन दारव्हा येथे कारवाई करिता नोंद करण्यात आली यापुढे प्रतिबंधित बियाण्यांची विक्री होऊ नये याकरिता सामान्य जनतेस जिल्हा पोलिसा मार्फत आवाहन करण्यात आले आहे.
प्रतिबंधित कपाशी बियाणे व इतर मुद्देमाल केला जप्त.
Bhagirath Raja 24 News.com
0

إرسال تعليق