महागाव तालुक्यात मोठा दरोडा

*महागाव तालुक्यात मोठा दरोडा*
यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्याच्या चिल्ली इजारा या ठिकाणी जवळपास एक करोड रुपयाचा तलवारी आणि पिस्तुलाच्या धाकावर दरोडा पडला असल्याने जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे .
चिल्ली इजारा येथील सदन कास्तकार संतोष पांडे यांचे घर शेतात आहे आणि 9 जून च्या मध्यरात्री आठ ते दहा दरोडेखोरांनी पिस्तूल आणि तलवारीचा धाक दाखवून नगदी 85 लाख व सोन्याचे दागिने लुटून मारहाण करून दरोडा टाकला .हा दरोडा जवळपास एक कोटी रुपयाचा असल्याची चर्चा आहे .माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड यांच्या मार्गदर्शना खाली उमरखेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड महागाव पोलीस स्टेशन ठाणेदार व पोलीस कर्मचारी पुढील तपास करत असून पोलिसांना काही धागेद्वारे सापडले असल्याची चर्चा आहे .

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...