राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष सुनयना येवतकर अपघातात गंभीर जखमी

राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष सुनयना येवतकर अपघातात गंभीर जखमी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यवतमाळ जिल्हा महिलाध्यक्ष तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या यवतमाळ जिल्हाध्यक्ष सामाजिक कार्यकर्त्या सुनयना संजय येवतकर यांचा आर्णी रोड यवतमाळ येथे कृषी नगर गेट समोरील रस्ता दुचाकीने ओलांडताना बालकृष्ण मंगलं कार्यालयाकडून वेगाने येणाऱ्या दुचाकी स्वाराने त्यांच्या दुचाकीला जबर ठोस मारली, त्यात सुनयना येवतकर यांच्या पाठीला व मनक्यांना जबर दुखापत झाली असून त्यांच्यावर डॉक्टर कसारे हॉस्पिटल येथे उपचार करण्यात आला. झालेल्या अपघाताची अवधूतवाडी पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली.
आर्णी रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक होते हा रस्ता व वरदळीचा आहे तसेच आजूबाजूला मोठा प्रमाणात भाज्यांचे दुकाने सुद्धा लागतात आणि रस्ता ओलांडताना मोठ्या प्रमाणात गाड्यांची येजा असल्याने या ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत याबद्दल नागरिकां मध्ये नाराजी आहे. वाहतूक विभागाने , नगर परिषदेने या पूर्ण रस्त्यावर सुरक्षेची उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांनी मागणी केली आहे.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...