⚡ ब्रेकिंग News

निराधार अर्थसहाय्यापासून निराधार तीन महिन्यांपासून लाभार्थी वाऱ्यावर थेट खात्यात अनुदान केव्हा मिळणार?

निराधार अर्थसहाय्यापासून निराधार तीन महिन्यांपासून लाभार्थी वाऱ्यावर थेट खात्यात अनुदान केव्हा मिळणार?
यवतमाळ : निराधार योजनेतील लाभार्थी अर्थसाहयापासूनच निराधार असल्याची गत आहे.मागील तीन महिन्यांपासून त्यांना दरमहा मिळणारे अर्थसहाय्य मिळाले नाही त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट घोंगावत आहे. शासनाने थेट त्यांच्या खात्यात अर्थसहाय्य जमा करण्याची घोषणा तर केली परंतु ही योजना अत्यंत मंद गतीने सुरू आहे. त्यामुळे या योजनेतील लाभार्थी पैशापासून अनेक अडचणींचा सामना करीत आहे यावर गुरुदेव संघाचे अध्यक्ष मनोज येडाम यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात निवेदन सादर केले आहे.
शासनाच्या संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृध्दपकाळ योजना,श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजनेसह अन्य योजनांच्या माध्यमातून मिळणाऱ्या अर्थसहाय्यावर लाखो लाभार्थ्यांची मदार आहे. यातून मिळणारे अर्थसहाय्य या घटकासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे यातूनच त्यांचा उदरनिर्वाह चालतो परंतु मागील तीन महिन्यांपासून यातील बऱ्याच लाभार्थ्यांना अर्थसहाय्य मिळाले नाही त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या संदर्भात तीव्र नाराजी व्यक्त करीत गुरुदेव संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून या प्रश्नांवर समाधान मागितले आहे.
सर्वसामान्य घटकातील या गरजूंना सध्या अर्थसाहयाची मोठी गरज आहे परंतु नेहमीप्रमाणे त्यांचे अर्थसहाय्य यावेळेसही तब्बल तीन महिने उशिरा मिळते आहे या पैशावर अवलंबून त्यांची बरीच कामे खोळंबली असून काहींना किराणा आणण्यासाठी देखील पैसे नसल्याचे वास्तव आहे. शासनाने या लाभार्थ्यांच्या खात्यात थेट अर्थसहाय्य वळते करण्याची घोषणा केली परंतु ही प्रक्रिया अत्यंत संथ गतीने सुरू आहे. लाभार्थ्यांना हयात प्रमाणपत्र सादर करण्यास जुलै महिन्यापर्यंत वाढ दिली आहे त्यामुळे जिल्हाभरातील लाभार्थी हयात प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच थेट अर्थसाह्यय योजनेचा लाभ घेऊ शकणार आहे. निराधार बांधव राष्ट्रीयकृत बँकेत चकरा मारताना किंवा बँकेच्या एखाद्या कोपऱ्यात तासनतास बसून असल्याचे आढळून येत आहे.निराधार केव्हा मिळेल याची विचारणा करण्यास ते तहसील कार्यालयात गेले असता त्यांना केवळ आमच्याकडे पैसे आले नाही त्यामुळे केव्हा येतील तेसुद्धा आम्ही सांगू शकत नसल्याचे सांगण्यात येते.कोंडीत सापडलेल्या या निराधार बांधवांना तात्काळ अर्थसहाय्य देण्यात यावे,अन्यथा जिल्हाभरातील निराधारांची मोट बांधून तीव्र आंदोलन करण्यात येईल,असा इशारा गेडाम यांनी निवेदनातून दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करतेवेळी गुरुदेव युवा संघाचे शाखा उपाध्यक्ष भाऊराव वासनिक, मंदा मानकर, रितेश चौधरी जुई चावला पवार, सब्बल सिंग, बाबू बिसलरी, जगन, सुहास कांबळे, प्रफुल खोब्रागडे, जय किशन, सटकेश पवार आदी उपस्थित होते. ही तर निराधारांची चेष्टा सर्वसामान्य घटकातील बांधवांना ही योजना वरदान स्वरूप आहे .दरमहा अर्थसहाय्य येईल या आशेवर निराधार बांधव दिवस काढत असतात परंतु आजपर्यंतच्या इतिहासात दरमहा यांना कधीही अर्थसहाय्य मिळाले नाही त्यामुळे याच्यावर आर्थिक संघटना उभे राहते यावेळी तीन महिन्यांचा कालावधी लोटला तरी देखील अर्थसहाय्य खात्यात जमा झाले नाही त्यामुळे निराधार बांधवांची अवस्था बिकट झाली असून शासनाने त्यांची चेष्टा केली आहे. या चार दिवसाच्या कालावधीत त्यांच्या खात्यात अर्थसहाय्य वळते करण्यात यावे अशी आमची मागणी आहे,अन्यथा आंदोलन उभे केले जाईल. - मनोज गेडाम,अध्यक्ष गुरुदेव युवा संघ, यवतमाळ.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...