⚡ ब्रेकिंग News

अखेर उत्तम टॉकीज रस्ताच्या कामाला सुरुवात* *प्रशासनाने घेतली दखल*

*अखेर उत्तम टॉकीज रस्ताच्या कामाला सुरुवात* *प्रशासनाने घेतली दखल*
आर्णी : शहरातील उत्तम टॉकीज रस्ता हा रहदारीचा असल्याने तो रस्ता नव्याने बनविण्यात यावा ,या मागणीचे मे. महिन्यात समाजिक कार्यकर्ते परवेज बेग यांनी आर्णी नगरपरिषद ला निवेदन दिले होते.अखेर नगरपरिषद ने उत्तम टॉकीज रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे.रस्त्याचा मागणीसाठी अविरत प्रयत्न करण्याऱ्या परवेज बेग यांचा प्रयत्नाला यश आले आहे.
उत्तम टाँकीज रस्ता हा शहरातील रहदारीचा रस्ता म्हणून ओळखला जातो या रस्त्यानी शास्त्री नगर अमराईपुरा मोमीनपुरा यासह आमणी, आसरा, विठोली या ग्रामीण भागातील ग्रामस्थांची रहदारी राहत असून विशेष म्हणजे शाळकरी चिमुकल्या विद्यार्थ्याची हि याच रस्त्यानी ये-जा राहते तसेच सर्व धर्मियांचे प्रार्थनास्थळे यांच रस्त्याने असल्याने भाविक भक्तगण सुद्धा यांच रस्त्यानी ये-जा करतात, उत्तम टॉकीज रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते. जुन्या सिमेंट रस्त्याचे लोखंडी गज उघडे पडले आहे पायी चालणार्‍यासह वाहन चालकासाठी अपघाताची होण्याची शक्यता बाळवली होती यामूळे या गंभीर बाबीचा विचार करुन उत्तम टाँकीजचा सिमेट रस्ता नव्याने बनविण्याची कार्यवाही करावी अशी मागणी निवेदना करण्यात आली होती . या मागणीचा विचार करून नगरपरिषद ने तातडीने रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...