माझ्या विजयासाठी आर्णी करांनी घेतलेले कष्ट मी आयुष्यभर विसरणार नाही - खासदार प्रतिभाताई धानोरकर
गावा गावात जाऊन जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार - खा. संजय भाऊ देशमुख
गणेश एकंडवार
आर्णी : लोकसभा निवडणुकीत माझ्या विजयासाठी आर्णी करांनी घेतलेले कष्ट मी आयुष्यभर विसरणार नाही. आता मिळालेल्या मतदानाचा सकारात्मक विचार करून आपण विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागूया. आर्णी केळापूर मधून ज्यांना उमेदवारी मिळणार ते निश्चित विजयी होतील, असा दावा आर्णी वणी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे विक्रमी मताधिक्याने निवडून आलेले खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी आर्णी येथे मंगळवारी (दि. १८) आपल्या भव्य नागरी सत्कार सोहळ्यात बोलताना केला.
आर्णी शहरातील माहेर मंगल कार्यालयात यवतमाळ वाशीम चे नवनिर्वाचित खासदार लोकनेते संजय भाऊ देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यास मा. आमदार ख्वाजा बेग, मा. आमदार बाळासाहेब मुनगीनवार, शिवसेनेचे उबाठा जिल्हाप्रमुख, उप जिल्हाप्रमुख, माजी नगरसेविक व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी बोलताना या निवडणुकीत आपण प्रामाणिक प्रयत्न केले, यापूर्वी काम करताना काही चुका झाल्या असतील त्या सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यामुळे येणार्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सकारात्मक विचार करून गावा-गावात जाऊन लोकांचे अडचणी दूर करा.
सोहळ्यात बोलताना लोकनेते शिवसेना उबाठा खासदार संजय भाऊ देशमुख आपली इच्छा व्यक्त केली. जिल्ह्यात मविआ चे सरकार आले आहे, गुपचुप का राहण्याचे काही कारण नाही उत्साहाने काम केले पाहिजे. आपण कोठे कमी पडलो याचा अभ्यास करायचा आणि संरक्षणात्मक भूमिका न घेता आक्रमक भूमिका घ्यायची आहे. इथले प्रश्न घेऊन लोकांच्यात जाऊ म्हणजे लोक आपल्याबरोबर येतील. स्टेजवर भाषण करण्यापेक्षा गावागावात जाऊन त्यांचे प्रश्न सोडवूया. विरोधकांना त्यांची जागा दाखवून देऊ या असे सांगून त्यांनी सांगितले.
▪️मविआतल्या सर्व पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते ज्यांनी या निवडणुकीमध्ये मविआ विजय साध्य करण्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली अशा सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून अभिनंदन व मनापासून धन्यवाद.
-मा.आ. ख्वाजा बेग
▪️भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या समस्या कडे, बेरोजगाराकडे इतरही समस्या कडे दुर्लक्ष केल्यामुळे आपल्याला मतदानातून दिसून आले. चंद्रपूर, वणी, आर्णी लोकसभा व आर्णी केळापूर विधानसभा मतदारसंघातील समस्या सोडवण्याचा माझा प्रयत्न राहील.
-खा. प्रतिभाताई धानोरकर
▪️येत्या विधानसभेत कोणताही उमेदवार दिला तरी त्या उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने निवडूण आणण्याचा आमचा प्रयत्न राहील.
मा. मंत्री शिवाजीराव मोघे
▪️राज्यात मविआ सरकारने ज्या पद्धतीने विकासासाठी काम केले आहेत त्याला राज्यातील तसेच यवतमाळ जिल्ह्यातील जनतेने कौल दिला त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन.
मा. आ. बाळासाहेब मुनगीनवार
▪️मतदारसंघातील जनतेने प्रचंड मताधिक्याने विजयी केल्या बद्दल त्यांचे धन्यवाद आता गावा गावात जाऊन जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार .
-खा. संजय भाऊ देशमुख
माझ्या विजयासाठी आर्णी करांनी घेतलेले कष्ट मी आयुष्यभर विसरणार नाही - खासदार प्रतिभाताई धानोरकर
Bhagirath Raja 24 News.com
0









إرسال تعليق