१ जुलैपासून कायद्यातील कलमांमध्ये बदल, नवी कलमे जाणून घ्या!
◆ भारतीय दंड विधानमध्ये पूर्वी *५११* कलमे होती, आता नव्या भारतीय न्याय संहितेमध्ये *३५८* कलमे आहेत.
◆ यात नवीन कायद्यात *२१ गुन्ह्यांची* भर पडली आहे. फौजदारी प्रक्रिया संहितामध्ये *५३१ विभाग* आहेत.
◆ नवीन कायद्यात *१७७* कलमे बदलली आहेत. नवीन *९* कलमे वाढवली आहेत. तर *१४* कलमे रद्द केली आहेत.
◆ भारतीय पुरावा कायद्यात आता *१७०* कलमे केली आहेत. दहशतवाद, मॉब लिंचिंग आणि राष्ट्रीय सुरक्षेला धोका करणाऱ्या गुन्ह्यात कडक शिक्षेची तरतूद केली आहे.
*कडक शिक्षेची तरतूद*
▪️ मॉब लिंचिंगमध्ये पाच किंवा जास्त व्यक्तींनी एकत्र येऊन हत्या केल्यास जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यास फाशीही होऊ शकते.
*१ जुलैपासून कलमांमध्ये झालेला बदल (प्रमुख कलमे)*
● भारतीय दंड विधान - भारतीय न्याय संहिता
● खून ३०२ - १०३ (१)
● खुनी हल्ला ३०७ - १०९
● गंभीर दुखापत ३२६ - ११८ (२)
● मारहाण ३२३ - ११५
● शांतता भंग ५०४ - ३५२
● धमकी ५०६ - ३५१ (२) (३)
● विनयभंग ३५४ - ७४
● चोरी ३८० - ३०५ (ए)
● दरोडा ३९५ - ३१० (२)
● विवाहितेचा छळ ४९८ (अ) - ८५
● बलात्कार ३७६ (१) - ६४ (१)
● सरकारी कामात अडथळा ३५३ - १३२
● अपहरण ३६३ - १३७(२)
● फसवणूक ४२० - ३१८ (४)
*जुन्या कायद्यात असा बदल*
▪️ भारतीय दंड विधान (आयपीसी)ऐवजी ‘भारतीय न्याय संहिता’ (बीएनएस), फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी)ऐवजी ‘भारतीय नागरी सुरक्षा संहिता’ (बीएनएसएस) आणि भारतीय पुरावा कायदाऐवजी ‘भारतीय साक्ष अधिनियम’ असा उल्लेख करण्यात येणार आहे.
१ जुलैपासून कायद्यातील कलमांमध्ये बदल, नवी कलमे जाणून घ्या!
Bhagirath Raja 24 News.com
0



टिप्पणी पोस्ट करा