अज्ञात चोरट्यानी पैस्याची पिशवी हिसकावून केला पोबारा
आर्णी शहरातील यवतमाळ रोडवरील पाण्याच्या टाकी जवळची घटना...
आर्णी:- कृषी उत्पन्न बाजार समिती येथील अडत व्यापाऱ्याजवळील सात लाख नव्वद हाजार रुपयांची रोकड,अज्ञात चोरट्यांनी हिसकावून पोबारा केल्याची घटना आर्णी शहरातील दाभडी रस्त्याजवळील पाण्याच्या टाकी नजीक सोमवारी दुपारी ३:३० वाजता दरम्यान घडली असून शुभम काजळे वय २६ वर्ष रा.आर्णी असे लुटण्यात आलेल्या अडत व्यापाऱ्याचे नाव आहे.याप्रकरणी शुभम काजळे यांनी आर्णी पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली असता.ठाणेदार केशव ठाकरे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून,तपास सुरु केला आहे.
याप्रकरणी सविस्तर वृत्त असे की,कृषी उत्पन्न बाजार समिती आर्णी येथील अडत व्यापारी शुभम काजळे यांनी दुपारी ३:३० वाजता दरम्यान आर्णी येथील एच डी एफ सी बँकेतून रोख सात लाख नव्वद हाजार रुपयांचा विड्रॉल करून आपल्या घराच्या दिशेने निघाले,मात्र पत्त्यावर असलेले अज्ञात चोरटे त्यांचा पाठलाग करत गेला,दरम्यान आर्णी शहरातील दाभडी रस्त्यानजीक पाण्याच्या टाकी जवळ मोटारसायकल वरील अज्ञात चोरट्याने व्यापारी शुभम काजळे यांना तुमचे पैसे पडत आहे. असा आवाज दिला,अडत व्यापारी शुभम काजळे यांनी मागे वळून बघितले असता,अज्ञात चोरट्यानी पैस्याची पिशवी हिसकावून यवतमाळ रस्त्याने पोबारा केला.अडत व्यापारी शुभम काजळे यांनी चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला,मात्र ते अयशस्वी झाले,दरम्यान शुभम काजळे यांनी याप्रकरणी आर्णी पोलिसांत तक्रार दिली असता,ठाणेदार केशव ठाकरे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत घटनास्थळी धाव घेऊन स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना पाचरण केले असता,स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले.दरम्यान अडत व्यापाऱ्याने रोख काढलेल्या एचडीएफसी बँकेतील सीसीटीव्ही फुटेज चेक करण्यात आली.पुढील तपास ठाणेदार केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात आर्णी पोलीस करीत आहे....
अज्ञात चोरट्यानी पैस्याची पिशवी हिसकावून केला पोबारा
Bhagirath Raja 24 News.com
0



إرسال تعليق