ऊमरीपठार वृध्दाश्रमाच्या वतीने यवतमाळचे माजी कलेक्टर ह.रा. कुळकर्णी यांना भावपुर्ण श्रध्दांजली—
ह.रा.कुळकर्णी माजी जिल्हाधिकारी यांचे प्रेरणा व मार्गदर्शनातुन ऊमरीपठार वृध्दाश्रमाची स्थापना,भावपुर्ण श्रध्दांजली—शेषरावजी डोंगरे
*******************
जवळा
यवतमाळ जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी ह.रा. कुळकर्णी यांचे निधन झाल्याचे त्यांच्या पत्निने ऊमरीपठार वृध्दाश्रमाचे संस्थापक शेषराव डोंगरे यांना कळविले.तेहतिस वर्षा पुर्वी यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे शेषराव डोंगरे यांनी घेतलेल्या युवकांच्या शिबीरास ऊमरीपठार येथे आले होते.त्यावेळी शेषराव डोंगरे यांनी निराधार झालेल्या वृध्दांच्या समस्या त्यांचे जवळ मांडल्या असता वृध्दाश्रम काढण्या संबधी मार्गदर्शन केले.त्यांचे प्रेरणेतुन आणि शेषराव डोंगरे संस्थापक यांचे द्येय ऊद्दिष्ठ्यातुन आज रोजी ह्या वृध्दाश्रमाचा डोलारा वृध्दांच्या सेवेने बहरुन आला. ऊमरीपाठार वृध्दाश्रमात कै.ह.रा.कुळकर्णी यांना कार्यक्रमाव्दारे श्रध्दाजली देण्यात आली.ह्यावेळी संस्थापक सचीव शेषरावजी डोंगरे यांनी संवेदना व्यक्त करतांना हा ऊध्दाश्रम जिल्हाधिकारी ह,रा .कुळकर्णी यांचे मार्गदर्शनातुन ऊभा झाला. एक कर्तबगार जिल्हाधिकारी समाजातील समस्या जाणुन घेवुन समाजसेवेचे बळ देवुन गेले.त्यांची आठवण हा वृध्दाश्रम हृदयात साठवुन आहे अश्या भावना व्यक्त केल्या.वृध्दाश्रमात शोककळा पसरली.ह्या वेळी सर्व वृध्द तसेच जयप्रकाश डोंगरे,डाॅ.ब्राम्हणकर,जयस्वाल ,कर्मचारी सेवक ऊपस्थित होते.
ऊमरीपठार वृध्दाश्रमाच्या वतीने यवतमाळचे माजी कलेक्टर ह.रा. कुळकर्णी यांना भावपुर्ण श्रध्दांजली—
Bhagirath Raja 24 News.com
0



إرسال تعليق