दिव्यांग निघाले विठ्ठलाच्या भेटीला पंढरीला....
सेवा समर्पण चॅरिटेबल ट्रस्ट यवतमाळ द्वारा प्रायोजित.. दिव्यांग संघ यवतमाळ द्वारा आयोजित "यवतमाळ ते पंढरपूर" पायी पालखी दिंडी सोहळ्याला काल अंगारकी चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर यवतमाळ येथून सुरुवात झाली.. काल भाम येथे मुक्काम करून पालखीसह दिव्यांग वारकरी काल ११.३० ला जवळा येथे पोहचले.. जवळा येथे दिंडीतील पायी वारकऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था केली होती.. तसेच जवळा येथीलच सागर निरपासे यांच्या वतीने वारकऱ्यांना फळांचे वाटप करण्यात आले.. दुपारी चार वाजता चहापाणी गोविंद झामरे यांच्या कडून करण्यात आले व चहापाणी घेतल्यानंतर पायी दिंडीने "राम कृष्ण हरी" च्या गजरात आर्णी कडे प्रस्थान केले. यावेळी पालखीसोबत पायी चालत सेवा समर्पणचे अध्यक्ष आदरणीय प्रशांतभाऊ बनगिनवार होते.. तर यावेळी मातोश्री सुशीलाबाई नागपुरे वृद्धाश्रमाचे संचालक श्री.खुशालभाऊ नागपुरे, माजी जि.प सदस्य नरेश रामटेके सर, श्री.दत्ताभाऊ तडसे, मातोश्री सुशीलाबाई नागपुरे वृद्धाश्रमाचे उपाध्यक्ष आशिष ढाकुलकर, राहुल खंदार, योगेश तडसे, अमोल सिस्तकार तसेच अनेक विठ्ठल भक्त हजर होते.
जय जय राम कृष्ण हरी 🌼🌼🙏🙏
दिव्यांग चालती पंढरीची वाट
Bhagirath Raja 24 News.com
0


إرسال تعليق