⚡ ब्रेकिंग News

लाडकी बहीण योजनेत 5 मोठे बदल; नव्या अटी जाणून घ्या..

लाडकी बहीण योजनेत 5 मोठे बदल; नव्या अटी जाणून घ्या..
भगीरथ राजा 24 न्यूज! महत्त्वाची अपडेट आता इथून पुढे महिलांना अर्ज करताना लाईव्ह फोटो द्यावा लागणार नाही, असे सांगितले आहे. यासह इथून पुढे नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरले जाणार असल्याची माहिती दिली आहे. या योजनेमध्ये आणखीन कोणते बदल झाले आहेत? याविषयी जाणून घेऊया.
▪️योजनेमध्ये झालेले महत्वाचे बदल खालील प्रमाणे आहेत. आता अर्ज भरताना महिलेच्या फोटोचा फोटो काढून तो ऑनलाइन अर्ज भरताना ग्राह्य धरण्यात येणार आहे. थोडक्यात, इथून पुढे महिलांना फॉर्म भरताना लाईव्ह फोटो द्यावा लागणार नाही. यापूर्वी अनेक नवविवाहित महिलांकडे रेशनकार्ड नसल्यामुळे अर्ज भरत असताना अडचण येत होती. त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या नवविवाहित महिलांच्या पतीचे रेशन कार्डच उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे.
तसेच परराज्यात जन्म झालेल्या परंतु सध्या महाराष्ट्रात वास्तव असलेल्या महिलांना अर्ज भरताना पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाईल. तसेच, 15 वर्षापूर्वीचे रेशनकार्ड आणि 15 वर्षापूर्वीचे मतदान कार्ड ही ग्राह्य असेल. यासह लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात येईल.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...