⚡ ब्रेकिंग News

कोसदनी येथे बिबट्याच्या हल्यात वगारी सह इतर प्राण्यांचा झाला मृत्यू

कोसदनी येथे बिबट्याच्या हल्यात वगारी सह इतर प्राण्यांचा झाला मृत्यू
आर्णी तालुक्यातील कोसदनी येथे बिबट्याच्या हल्यात वगारी सह कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक 15 जुलै ला पहाटे 4 च्या दरम्यान घडली आहे. मोहन हातमोडे असे नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे. कोसदनी येथील रहिवासी मोहन हातमोडे यांचे कोसदनी शेत शिवारात शेत असून शेतात गोठ्यात कोंबड्या ,म्हशी व वगारी आहे अचानक बिबट्याने या जनावरांवर हल्ला चढविला या मध्ये एकूण 2 वगारी,1 हल्या, 9 कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे
बिबट्याच्या झालेल्या हल्ल्याने परिसरात एकच दहशत पसरली आहे सदर घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते निलेश आचमेलवार यांनी वन विभागाला दिली असून कोसदनी येथील वनरक्षक पुंडलिक खत्री, वनपाल पि सी जाधव , वन मजूर कैलास कांबळे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आहे

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...