⚡ ब्रेकिंग News

प्रत्येक वाहनाला 50 हजार रुपये दंड : आरटीओ व शिरपूर पोलिसांची मोहिम..

प्रत्येक वाहनाला 50 हजार रुपये दंड : आरटीओ व शिरपूर पोलिसांची मोहिम..
कोळशाची ओव्हरलोड वाहतूक : 12 वाहनावर कारवाईचा बडगा..
तालुक्यातील शिरपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मोहदा, वेळाबाई आबाई फाटा फाट्यावर ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या बाहनांवर गुरुवारी सायंकाळी आरटीओ, शिरपूर पोलिस व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या संयुक्त वतीने रात्री वाजेपर्यंत कारवाई सुरु होती. विशेष म्हणजे ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी सकाळी 11 वाजता सुरु झाली. रात्री 9 वाजले तरी कारवाई सुरुच होती. ढाकोरी येथिल सरपंच अजय कवरासे, कुईचे विजय झाडे, तुळशिराम बोबडे व गावकऱ्यांचे कारवाई करिता सहकार्य लाभले होते.
शिरपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वेळाबाई मोहदा परिसरात अनेक खानी आहे. सदर खानी मधुन गोट्टी, डोलोमाईन, मुरुम अशा खनिजांची वाहतूक वाहनांमधून सुरु आहे. विशेष म्हणजे ज्या रस्त्यावरून सदरची सुरु बाहतूक सुरु आहे. त्या रस्त्याची क्षमता 55 टन वजनाची असताना सदर वाहनांमधून 70 टन वजनाची ओव्हरलोड वाहतूक सुरु असल्याने शिरपूर वेळाबाई मोहदा रस्त्याचे तिन तेरा वाजले आहे. जागोजागी खड्डे पडले आहे. गुरुवारी 18 जुलै ला सकाळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सदर रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरु असताना वेळाबाई- मोहदा कडुन ओव्हरलोड वाहने येत असताना बांधकाम विभागाचे अभियंता सुहास ओचावार यांना दिसून आले. त्यांनी याबाबतची माहिती आरटीओ अधिकाऱ्यांसह शिरपूर पोलिसांना दिली. यावेळी शिरपूर पोलिस घटनास्थळी पोहोचले.
आरटीओ उशिरा पोहोचल्याने सकाळी 11 वाजताची कारवाई रात्री 9 वाजेपर्यंत सुरु होती. यावेळी 55 टन वजनाची क्षमता असताना 68 ते 70 टन वजनाची ओव्हरलोड वाहतूक करताना 10 ते 12 आयव्हा ट्रक वाहने आढळून आले होते. एका ओव्हरलोड आयव्हा ट्रक वर अंदाजे 40 ते 50 हजाराचा दंड वसूल करण्यात येणार आहे. कारवाई पूर्ण झाल्यानंतर कारवाईची पुर्ण माहिती देण्यात येईल असे आरटीओ अधिकाऱ्यांनी सांगितले, यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किन्द्रे, शिरपूरचे ठाणेदार माधव शिंदे हे आपल्या पथकासह उपस्थित होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सुहास ओचावार व त्यांचे सहकारी सुद्धा उशिरापर्यंत हजर होते. कारवाईची उशिरापर्यंत सुरूच होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...