कोसदनी येथे बिबट्याच्या हल्यात वगारी सह इतर प्राण्यांचा झाला मृत्यू
आर्णी तालुक्यातील कोसदनी येथे बिबट्याच्या हल्यात वगारी सह कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक 15 जुलै ला पहाटे 4 च्या दरम्यान घडली आहे.
मोहन हातमोडे असे नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे.
कोसदनी येथील रहिवासी मोहन हातमोडे यांचे कोसदनी शेत शिवारात शेत असून शेतात गोठ्यात कोंबड्या ,म्हशी व वगारी आहे अचानक बिबट्याने या जनावरांवर हल्ला चढविला या मध्ये एकूण 2 वगारी,1 हल्या, 9 कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे
बिबट्याच्या झालेल्या हल्ल्याने परिसरात एकच दहशत पसरली आहे
सदर घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते निलेश आचमेलवार यांनी वन विभागाला दिली असून कोसदनी येथील वनरक्षक पुंडलिक खत्री, वनपाल पि सी जाधव , वन मजूर कैलास कांबळे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आहे
कोसदनी येथे बिबट्याच्या हल्यात वगारी सह इतर प्राण्यांचा झाला मृत्यू
Bhagirath Raja 24 News.com
0


टिप्पणी पोस्ट करा