⚡ ब्रेकिंग News

नीट'चा महाघोळ : पुनर्परीक्षा दिली नसताना रँक ११ हजारांवरून ११ लाखांवर

नीट'चा महाघोळ : पुनर्परीक्षा दिली नसताना रँक ११ हजारांवरून ११ लाखांवर
आर्णी : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) ने राबविलेल्या वैद्यकीय - प्रवेशाच्या नीट परीक्षेचा सावळा गोंधळ संपण्याची चिन्हे नाहीत. या महाघोटाळ्याचा मोठा फटका यवतमाळ जिल्ह्यातील एका विद्यार्थिनीला बसला आहे. या मुलीला पहिल्या परीक्षेत ६४० गुण मिळाले होते व ऑल इंडिया रैंक ११ हजारावर होती. मात्र, दुसऱ्यांदा झालेली परीक्षा दिली नसताना नव्याने आलेल्या गुणपत्रिकेत तिचे गुण इतके घटले की, ती थेट ११ लाख रैंकवर फेकली गेली. यामुळे तिला व कुटुंबीयांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. या मुलीचे नाव भूमिका राजेंद्र डांगे असे असून ती यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी येथील रहिवासी आहे. तिचे वडील राजेंद्र डांगे हे सीआरपीएफचे सेवानिवृत्त सैनिक असून सध्या आर्णीच्या ग्रामीण रुग्णालयात सुरक्षा रक्षक म्हणून सेवा देत आहेत.
▪️मुलीचे डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगले नव्याने गुणपत्रिका आली तेव्हा आम्हांला मोठा धक्का बसला. माझ्या मुलीचे डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगले. याबाबत आम्ही एनटीएला ई-मेलही पाठविला; पण त्याचे प्रत्युत्तर आले नाही. काय करावे कळेना झाले आहे. - राजेंद्र डांगे, भूमिकाचे वडील

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...