⚡ ब्रेकिंग News

भांब टोल प्लाझा तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल

*भांब टोल प्लाझा तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल*
जवळा दि.१ : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वरील भांब टोल प्लाझा येथे काल सायंकाळी फास्ट टँगमध्ये पैसे नसल्याने वाहन सोडण्यावरुन टोल प्लाझाची तोडफोड करण्यात आली होती. सदर तोडफोड प्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. काल सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास MH 29 AR 2412 हे वाहन जात असतांना फास्टटॅग मध्ये पैसे नसल्यामुळे वाहन सोडण्यावरुन वाद निर्माण झाला होता. त्यावेळी झालेल्या तोडफोडीत अंदाजे 2 लाख रुपयांच्या शासकीय संपत्तीचे नुकसान करण्यात आले आहे.
सदर प्रकरणी टोल प्लाझा कर्मचा-यांनी दिलेली माहिती व एफआयआरनुसार आर्णी तालुक्यातील लोणबेहळ येथील मयुर बाबाराव गरड, आशिष तुळशिराम नागेलवार, प्रशांत भिमराव मरकटे यांच्यावर सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे सन १९८४ कलम ३ व कलम 504 भारतीय दंड विधाननुसार ग्रामीण पोलिस स्टेशन, यवतमाळ येथे गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. पुढील तपास ग्रामीण पोलिस स्टेशन, यवतमाळ करीत असल्याचे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक अमरीश मानकर यांनी कळविले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...