शहरातील रस्ते दुरुस्तीच्या प्रतीक्षेत, लोकप्रतिनिधींना आश्वासनाचा विसर
लोकप्रतिनिधी फक्त निवडणुकीच्या वेळी मत मागतात नंतर विसरून जातात.
आर्णी : शहरात पाऊस झाला की चौका चौकात खड्यात पाणी साचते साचलेल्या पाण्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढते. माहूर चौक, आमणी-आसरा रोड, भारती शाळा जवळील रोड, राॅयल टेलर जवळचा रोड, डायमंड नगर कडे जाणारा रोड इत्यादी रस्त्यावर खड्यात पाणी साचून प्रचंड प्रमाणात चिखल होते माहुर चौकात मोठ मोठे खडे पडले या खड्यापायी वाहण धारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो तर काही वाहनांचा अपघात या खड्यामुळे झाला.
शहरातील कोणताही रस्ता सुधारित नाही पावसाळ्यात रस्त्याची चांगलीच वाट लागली तरी रस्त्यावरिल खड्डे सुधारित करण्यासाठी संबंधित विभाग व लोकप्रतिनिधी वेळ नसल्याने शहराची दैनावस्था वाढत आहे.
मागील बऱ्याच वर्षा पासून बाबासाहेब आंबेडकर पुतळा पासून ते माहुर चौक पर्यंत चा अर्धवट रस्ता संबंधीत विभागाने वाऱ्यावर सोडला आहे. शहरातील रस्ते खड्डेमय झाले तरी लोकप्रतिनिधी व प्रशासन या रस्त्याकडे दुर्लक्षितपणा करित असल्याचा आरोप येथील नागरीक करित आहे.
आर्णी शहरातील रस्ते दुरुस्तीच्या प्रतीक्षेत, लोकप्रतिनिधींना आश्वासनाचा विसर
Bhagirath Raja 24 News.com
0



إرسال تعليق