बंदी भागातील एक पोलीस देव माणूस (दराटी पोलीस स्टेशन ठाणेदार योगेश वाघमारे )

बंदी भागातील एक पोलीस देव माणूस (दराटी पोलीस स्टेशन ठाणेदार योगेश वाघमारे )
पोलीस हा फक्त राजकारणी, श्रीमंत आणि अधिकारी यांनाच चांगली वागणूक देतो त्यांचे एकूण घेतो व गरीब सामान्य माणसाला हे जवळ सुद्धा उभे करत नाही हे चित्र साधारण माणसाच्या डोक्यात छापल गेल आहे .वर्दीतल्या माणसाबद्दल सहसा फारसं चांगलं बोललं जात नाही! हे आपल्या कानावर पडतच रहातं. अर्थात याचा अर्थ असा नाही की वर्दीतली सर्वच माणसं वाईट असतात.त्यातीलच एक देव माणूस म्हणजे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश आर वाघमारे.
दै.आत्ताच एक्सप्रेसचे विदर्भ विभाग संपादक अनिल राठोड यांचे सत्कार करण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील,उमरखेड तालुक्यातील दाराटी येथे गेलो असता पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश आर वाघमारे यांच्याशी भेट झाल्यावर जाणवलं . त्यानां भेटून प्रथमच आम्हाला जाणवलं की खरच पोलीस हा राज्य सरकारचा कर्मचारी असून कायदा व सुव्यवस्था राखण्याची तसेच मालमत्तेचे रक्षणाची जबाबदारी त्यास सोपविलेली आहे. आवश्यक प्रसंगी बळाचा वापर करण्याचेही त्यास अधिकार आहेत. पोलिसामुळे आपण सुरक्षित आहोत. परंतु त्यांचे जीवन खूपच असुरक्षित आहे. पोलीस हे कर्तव्य निष्ठ असतात.
पोलीस निरीक्षक योगेश आर.वाघमारे यांचा गाव बारामती,पुणे त्यांच शिक्षण बारामती व पुणे येथे झाले ते 2004 मध्ये पुणे येथे पोलीस खात्यात पोलीस निरीक्षक म्हणून लागले नंतर त्यांनी मुंबई, अकोला येथे नोकरी केली आणि आज ते दराटी येथे कार्यरत आहे. त्यांचा परिचय देतानी तेथील कर्मचारी रवि जाधव यांनी सांगितलं की,साहेबांना समाजामध्ये वावरताना त्यांनी आपल्या पदाचा रुबाब दाखविला नाही. ते दररोज गावात फेरफटका मारत असताना गावातील स्वच्छतेचा अढावा घेतात, शाळेत जाऊन लेकरांना चॉकलेट देऊन त्यांचा मार्गदर्शन करतात आणि शाळेतील विद्यार्थीही त्यांना पाहून आंनदी होतात आणि त्यांच्या सारखे अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगतात, साहेबांच्या या प्रेमळ स्वभावाने लहान लेकरात पोलीस प्रति असलेली भीती दूर झाल्याने विद्यार्थी त्यांच्या अवती -भवताली गर्दी करतात , ते मुक्या जनावरला पण तेवढाच जीव लावतात त्यामुळे गावात रस्त्यावर चालतना सुद्धा जनावरे त्यांच्या जवळ येतात. तसेच सहयोगी कर्मचारी म्हणतात बंदी भागातील लोकांना दवाखान्यात जाण्यासाठी शहरात जावे लागते याची जाणीव ठेऊन पावसाने किंवा वाऱ्याने रस्त्यावर पडलले झाडे ते स्वतः जाऊन बाजूला करतात,एक दिवशी तर पावसात कुपटी ते दराटी जवळील पूल लहान असल्यामुळे पावसाने आलेले झाडे व गाळ त्या मध्ये अडकून पुलाच्यावरून पाणी वहात होते. वाहत आलेले झाडे रस्त्यावर आल्यामुळे रस्ता दिसत नसल्याने अपघात होऊ नये म्हणून साहेबानी सर्व वाहतूक थांबून कर्मचारी आणि स्वतः तेथील पडलले झाडे कापून रस्त्यावर असलेले झाडे बाजूला केले व पाणी उतरत नाही तो पर्यंत तिथून गेले नाही ना! व वहान जाऊ दिले नाही!आणि रस्ता मोकळे होताच त्यांनी सगळ्यांना सुख रूप जाण्यासाठी रस्ते मोकळे करून दिले. आताच त्यांनी दाराटी गावात पोलीस भरती च्या वेळेस तरुणांनाकडून तयारी करून पोलीस भरती मध्ये पास होऊन नोकरीला लागावे यासाठी त्यांना मार्गदर्शन केले आणि आता ते गावात रक्तदान शिबीर घेणार असल्याचे सांगितले त्यांचे हे उपक्रम आयकून आम्ही चकित होऊन आमच्या मनात या समाजसुधारक बद्दल आपोआप आदर ची भावना निर्माण झाली.मनात आणखीन त्यांच्या बद्दल जाणून घेण्याची उत्सुकता झाली.
त्यांच्याजवळ जाऊन विचारले असता साहेब आपण एवढे चांगले काम करत आहात आणि आपण प्रसार माध्यमा पासून दूर का? तेव्हा त्यांनी सांगितले की, मला लहान पणापासूनच समाजसेवा करण्याची इच्छा होती म्हणूनच मी पोलीस खात निवडले आहे. त्यांनी हे म्हणत असे सांगितलं की मला समाजसेवा करण्याचं व्यसन जडलेले आहे त्यामुळे मला प्रसिद्दी मिळवून मला मोठे पणा करायचे नाही. त्त्यांचे समाजसुधारक विचार आम्हाला फार आवडले आणि आम्ही त्यांना विनंती करत विचारले सर तुम्हाला प्रसिद्दी नको असले तरी पण आम्ही आमच्या वृत पत्रात तुमच्या बद्दल लिहले तर, इतर पोलीस खात्यातील अधिकारी तुमच्यापासून प्रेरणा घेऊन तुम्ही करत असलेल्या कामाचे अनुकरण करून समाजामध्ये समाजसुधारक म्हणून काम करत राहतील आणि पोलीस खात्या प्रती असलेली मलीन प्रतिमा पुसून एक निर्मळ आणि प्रामाणिक प्रतिमा तयार होईल.यावर ते हसले!पण दराटी पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश आर वाघमारे यांच्या व्यक्तिमत्व समाजसुधारकवर लिहिण्याचा मोह आवरला नाही!

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...