वणी तालुक्यातील पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचा तात्काळ पंचनामा करून भरपाई द्या !

वणी तालुक्यातील पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचा तात्काळ पंचनामा करून भरपाई द्या !
काँग्रेसचे युवा नेते संजय खाडे यांची मागणी वणी तालुक्यामध्ये गेल्या एका आठवड्यापासून सतत पाऊस सुरु आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे नदी, नाल्याला पूर येऊन नदीलगत असलेल्या शेतींना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होणार आहे. सतत पडत असलेल्या पावसामुळे वणी तालुक्यातील घोन्सा, शिवनी, चिंचोली, सावंगी, मुंगोली, माथोली, जुगाद, साखरा, कोलगाव, चिखली, टाकळी, येनक, येनाडी, एकार्जुना, शिंदोला, नायगाव, कैलासनगर इत्यादी गावातील शेती प्रभावित झाली आहे. त्यामुळे शेतक-यांचे शेत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या झालेल्या नुकसानीचा अद्यापही पंचनामा झालेला नाही. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ नुकसानीचा पंचनामा करावा. तसेच शेतक-यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय खाडे यांनी उपविभागीय अधिकारी वणी यांना दिलेल्या निवेदनातून केली.
त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या निवेदनामध्ये वणी तालुक्यातील शेलु, रांगणा, भुरकी, वडगांव, झोला, कोना, जुनाड, चिंचोली, कवडशी, सावंगी, उकणी या गावांना नेहमीच पुराचा धोका असतो. पूर आला की या गावाचा संपर्क तुटतो. त्यामुळे नागरिकांना याचा मोठा फटका बसतो. दोन वर्षापूर्वी अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे यावर्षी पावसाचा जोर बघता योग्य ती उपाययोजना तात्काळ करावी. अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदन देते वेळी पुरुषोत्तम आवारी, प्रा. शंकर व-हाटे, प्रमोद वासेकर, राजाभाऊ पाथ्रडकर, पवन शा. एकरे, तेजराज बोढे यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...