जि. प. च्या शाळेत शिक्षक द्या अन्यथा १ ऑगस्ट पासून जि. प. समोर घंटानादआंदोलन करू*...

*जि. प. च्या शाळेत शिक्षक द्या अन्यथा १ ऑगस्ट पासून जि. प. समोर घंटानादआंदोलन करू*...
प्रविण देशमुख.. यवतमाळ जिल्हा परिषदेच्या शाळांच्या मध्ये रिक्त असलेली १५६० शिक्षकांची पदे तातडीने भरावी अशी मागणी जिल्हा परिषद यवतमाळ चे माजी अध्यक्ष श्री,प्रवीण देशमुख यांनी आज कार्यकारी अधिकारी यवतमाळ जिल्हा परिषद यवतमाळ यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
यवतमाळ तालुक्यात 100 आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात उर्वरित चौदाशे शिक्षकांची पदे रिक्त असून यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर मोठा विपरीत परिणाम होत असून त्यांची शैक्षणिक कोंडी होत असल्याचे निदर्शनास येत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत जाणारे विद्यार्थी शेतकरी कुटुंबातून येतात आणि अतिशय संघर्षाने आपला शिक्षण प्रवास पूर्ण करतात. या पोरांच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक शिक्षणावरच शिक्षकांच्या अभावी गंडांतर येत असेल तर ग्रामीण भाग शैक्षणिक दृष्ट्या अधिकच मागे जाईल.असे निवेदनात पुढे म्हटले आहे. प्रशासनाने तत्काळ निर्णय आणि एक ऑगस्टपर्यंत शिक्षक न नेमल्यास १ ऑगस्ट पासून जिल्हा परिषद समोर घंटा नाद आंदोलन करू असा इशारा पत्रकात देण्यात आला आहे.
निवेदन देते वेळी श्री.प्रवीण देशमुख माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद,यवतमाळ,अशोकराव बोबडे,प्रा. घनश्याम दरणे, दिनेश गोगरकर,किरण कुमरे,संजीवनी कासार,अनिल गायकवाड, अक्षय जगताप आदी मंडळी उपस्थित होती. निवेदन देतेवेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शिष्टमंडळाशी चर्चा करून काहीतरी मार्ग काढू असे अभिवचन दिले.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...