नकली फेविक्विक विकणाऱ्या दोन दुकानांवर पोलिसांची धाड
ता.प्र.
वणी: नकली फेविक्विक बाळगून विक्री करणाऱ्या दोन दुकानांवर
पोलिसांनी धाड टाकून ३१ हजार ८५० रुपयांचा नकली फेविक्विकचा माल जप्त केला. या कारवाईने खळबळ उडाली आहे.
कंपनीच्या अधिकृत प्रतिनिधीच्या तक्रारीवरून पोलिसांनी मंगळवारी रात्री ९:१५ वाजता सिंधी कॉलनी येथील ज्योती किराणा-जनरल स्टोअर आणि गाडगेबाबा चौकातील रवींद्र किराणा स्टोअर या दोन दुकानांवर धाड टाकली.
फेविक्विक उत्पादनाचे हुबेहूब नकली फेविक्विक मार्केटमध्ये विक्री होत असल्याच्या तक्रारीवरून कंपनीचे अधिकृत प्रतिनिधी अल्ताफ रौशन शेख यांनी आपले सहकारी प्रशांत प्रहलाद मादेसोबत वणीत दाखल झाले.
त्यांच्याकडे असलेल्या माहितीच्या आधारे सिंधी कॉलनी येथील ज्योती किराणा अँड जनरल स्टोअर या दुकानात नकली फेविक्विकची विक्री होत असल्याची त्यांनी खात्री केली. त्यानंतर वणी पोलिस ठाण्यात रीतसर तक्रार केली. पोलिस कर्मचाऱ्यासह हे दुकानावर धाड टाकली. पोलिसांनी दुकानातून पिडीलाइट
फेविक्विकसारखी पॅकिंग व हुबेहूब रंगसंगत असलेले पाच रुपये किमतीचे एक हजार १५८ नग डुप्लिकेट फेविक्विक जप्त केले. त्याची किंमत पाच हजार ७९० एवढी आहे. हे नकली फेविक्विक कोठून आणले, याबाबत पोलिसांनी विचारणा केली असता दुकानदारांनी गाडगेबाबा चौकातील
रवींद्र किराणा स्टोअर येवून आणल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिस व पिडीलाइट कंपनीचे प्रतिनिधी अल्ताफ शेख यांनी गाडगेबाबा चौकातील रवींद्र किराणा स्टोअर या दुकानात जाऊन तपासणी केली असता, दुकानातून २६ हजार ४५ रुपये किमतीचे पाच हजार २०९ नग नकली फेविक्विक पाऊच जप्त केले. अल्ताफ रोशन शेख यांच्या चारपट दर
तक्रारीवरून दोन्ही दुकान मालकाविरुद्द कॉर्पोरेट अॅक्ट ६३, ६५ आणि भा.न्या.सं. कलम ३१८ (२) नुसार गुन्हा दाखल केला.
नकली फेविक्विक विकणाऱ्या दोन दुकानांवर पोलिसांची धाड !!
Bhagirath Raja 24 News.com
0



إرسال تعليق