वाई बाजार येथील किराणा दुकानातून भेसळयुक्त खाद्यतेलाची विक्री.*

*वाई बाजार येथील किराणा दुकानातून भेसळयुक्त खाद्यतेलाची विक्री.*
*अन्न व औषध प्रशासनाचे वाई बाजार कडे पूर्णपणे दुर्लक्ष..* *सारखणी येथे झालेल्या कारवाई. नंतर वाई बाजार येथे कारवाई होणे अपेक्षित..* माहूर तालुक्यात सर्वात मोठी बाजार पेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाई बाजार येथे मोठ्या प्रमाणात मोठ मोठाले किराणा दुकान स्थापित झाले आहे. या किराणा दुकानातून भेसळयुक्त मालाची विक्री केली जात असल्याची चर्चा मात्र गावात सुरू आहे. तर काही किराणा दुकानातून चक्क टाक्यामधून तेल काढून नामांकित कंपनीच्या पीप्यांमध्ये भरून विक्री केली जात असल्याचे चित्र पाहावेस मिळाले. चांगल्या कंपनीच्या नावाखाली भेसळयुक्त तेलाची विक्री सध्या वाई बाजार येथील किराणा दुकानातून केली जात आहे. सर्वांनाच गरजेचे असलेले खाद्यपदार्थात वापरला जाणाऱ्या खाद्य तेलाची वाई बाजार येथील किराणा दुकानदारांकडून काळाबाजार सुरू आहे. त्या टाक्यामधून सायकलीच्या ट्यूबच्या साह्याने तेलचे पिपे भरले जात आहे. याचाच परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. वाई बाजार या बाजारपेठेला एकूण ४० ते ५० गावांचा संपर्क येतो सर्वात मोठी बाजारपेठ असल्याने स्थानिक सर्व परिसरातील नागरिक किराणा तसेच रोज रास पने लागणाऱ्या वस्तूंची खरेदी वाई बाजार येथून खरेदी करण्याकरिता येतात मात्र याचाच फायदा घेत किराणा दुकान धारकांनी कमी दिवसात जास्त पैसा कमवायच्या नादात सर्व सामान्य जनतेचे आरोग्यांशी खेळणे चालू केले आहे. अन्न व औषध प्रशासनाने वाई बाजार येथे विशिष्ट लक्ष घालण्याची गरज आहे. मागे अशाच प्रकरणात सारखणी येथे झालेल्या कारवाई नंतर वाई बाजार येथे देखील किराणा दुकान धारकांची चौकशी व्हावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. चौकट... भेसळयुक्त खाद्य तेलामुळे आरोग्यावर कोणते परिणाम होऊ शकतात.. ◾भेसळयुक्त तेलाचे सेवन केल्याने आरोग्यावर प्रचंड घातक असे परिणाम होऊ शकत असल्याचे डॉक्टर यांनी स्पष्ट केले आहे. ◾अशा बनावटी तेलांमध्ये अनेकदा ट्रान्स फॅट्ससारखे अतिशय घातक पदार्थ उपलब्ध असतात; जे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीचे आजार, लठ्ठपणा व मधुमेह यांसारख्या मोठ्या प्रमाणात गंभीर आजारांना आमंत्रण देऊ शकतात. ◾या भेसळयुक्त तेलांमध्ये जड धातू, कीटकनाशकांचे घटक किंवा औद्योगिक रसायनांसारख्या अनेक हानिकारक व विषारी बाबी असू शकतात; ज्यामुळे यकृत व किडनीचे नुकसान होणे, न्यूरोलॉजिकल विकार, त्याचबरोबर रोगप्रतिकार शक्ती कमी होणे यांसारख्या समस्या उदभवू शकतात. ◾बनावटी तेलांमधील अँटिऑक्सिडंट्स आणि फॅटी अॅसिड्सच्या कमतरतेमुळे सेल्युलर इंटिग्रिटीमधील समतोल राखण्यास अडथळा निर्माण होतो. तसेच, जळजळ कमी करणाऱ्या आणि चयापचय क्रियांना मदत करणाऱ्या पोषक घटकांपासून शरीर वंचित राहते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...