⚡ ब्रेकिंग News

अभ्यास दौऱ्याचे पितळ उघडे एक लाखाची रक्कम गिळंकृत

अभ्यास दौऱ्याचे पितळ उघडे एक लाखाची रक्कम गिळंकृत फुलसावंगी येथील वि.वि.का.स. सोसायटीच्या माजी अध्यक्ष व संचालकांचा प्रताप महागाव ता. प्र . निलेश नरवाडे महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या माजी अध्यक्ष व संचालक मंडळांनी सन २०१८ व १९- २० या कार्यकाळात संस्थेच्या अभ्यास दौऱ्याचे नियोजन केले होते. दरम्यान याचा रीतसर ठरावही घेण्यात आला होता. या अभ्यास दौऱ्यासाठी तत्कालीन अध्यक्ष शेख हमीद शेख मस्तान यांच्या नावे एक लाख रुपये उचलण्यात आले.परंतु या दरम्यान सदर संचालक दौऱ्यावर गेलेचं नाही.यातील चार संचालकांनी आम्ही अभ्यास दौऱ्यावर गेलो नसल्याचे पुसद येथील सहकार आधीकारी यांना लेखी स्वरूपात कळविले होते.सदर अभ्यास दौरा हा,बोगस असल्याची तक्रार माजी संचालक मन्सूरोद्दीन बद्रोद्दीन नवाब आणि किशोर पांडे यांनी उपविभागीय सहकार आयुक्त यांचेकडे केली.दरम्यान या तक्रारीची सबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घेतली व या संदर्भात महागाव येथील सहकार आधीकारी अच्युत भागानगरे यांना या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश दिले.दरम्यान भागानगरे यांनी सखोल चौकशी करून आपला अहवाल पुसद येथील सहकार आधीकरी भालेराव यांना सादर केला. बॉक्स: चार संचालकांनी अभ्यास दौऱ्यावर गेलो नसल्याचे दिले लेखी स्वरात पत्र मंगु थावरा राठोड,गोविंदा पोटे,दिगंबर डूमने,पंजाब जंगले यांनी आम्ही दौऱ्याव गेलो नसल्याचे लेखी स्वरूपात पत्र दिले.यामध्ये दोन महिला संचालक सुद्धा गेल्या नाहीत.त्यामुळे केवळ पाच संचालकांनी यात रक्कमाचे अपहार केल्याचे दिसून येते. बॉक्स : अभ्यास दौऱ्यावर जाण्याच्या आटीचा केला भंग ह्या आहे अटी... अभ्यास दौऱ्यासाठी कर्ज वसुलीच्या रकमेचा वापर करता येणार नाही, तसेच अभ्यास दौऱ्याकरिता करण्यात येणाऱ्या निधीचा गैरवापर व अनिमित्त होणार नाही याची नोंद घ्यावी. अन्यथा त्या संस्थेच्या संचालक मंडळ व कर्मचारी हे जबाबदार राहतील आणि अभ्यास दौरासाठी केला जाणारा खर्च इतर कोणत्याही कामावर खर्च करता येणार नाही त्याचप्रमाणे सदर अभ्यास दौरा हा सन २०१९- २० याच कालावधीत करण्यात यावा. अभ्यास दौऱ्यास मध्ये संस्थेचे संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांचा समावेश असेल, अभ्यास दौऱ्याकरता निश्चित करण्यात आलेला निधी एक लाख रुपये मर्यादित असेल. ह्या सर्व अटी व नियामंना धाब्यावर बसवून सदर संचालकांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट होत आहे. बॉक्स: मी चौकशी करून वरिष्ठांना अहवाल सादर केला आहे.यात तक्रार कर्त्याचे म्हणणे होते की सदर संचालक हे अभ्यास दौऱ्यावर गेले नाही.तर यातील काही संचालक म्हणाले आम्ही अभ्यास दौऱ्यावर जाऊन आलो.या संदर्भात माझेकडे तक्रार प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने चौकशी अधिकारी म्हणून मी याची सखोल चौकशी करून तसा अहवाल वरिष्ठांना सादर केला. अच्युत भागानगरे, सहायक निबंधक श्रेणी एक महागाव.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...