⚡ ब्रेकिंग News

गोर सेना यांच्या कडून एक शिक्षक वाढीसाठी गटशिक्षणाधिकारी यांना दिले निवेदन*

*गोर सेना यांच्या कडून एक शिक्षक वाढीसाठी गटशिक्षणाधिकारी यांना दिले निवेदन*
*आर्णी : विठोली* शैक्षणिक वर्ष २०२४ ते २०२५ ला नुकतीच शाळेला सुरुवात झाली असून शाळा सुरु झालेल्या आहेत. आर्णी तालुक्यातील विठोली या गावातील शाळेत एक ते वर्ग चार पर्यंत वर्ग असून विदयार्थ्यांची पटसंख्या ४५ आहे. परंतु चार वर्ग सांभाळण्याकरिता फक्त एकच शिक्षक कार्यरत आहे. त्यामुळे या चार वर्गाचा भार एकाच शिक्षकांवर असून, एक शिक्षक चार वर्गांचा सांभाळ करणे अशक्य आहे.
यात विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. चारवर्ग सांभाळण्याकरिता किमान दोन तरी शिक्षक हवेत परंतु विठोली गावात फक्त एकच शिक्षक आहे. या बाबीचे गांभीर्य लक्षात घेऊन, गोरं सेना आर्णी तालुक्याच्या वतीने गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती आर्णी यांना निवेदन देण्यात आले. नवीन शैक्षणिक सत्र सुरु झाले असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या करिता तातडीने एक शिक्षक नेमण्यात यावा ही मागणी करण्यात आली.निवेदन देते वेळेस गोरं सेनेचे तालुका अध्यक्ष अविनाश राठोड,ता.उपाध्यक्ष अर्जुन पवार,विनोद जाधव व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...