कृषी चालकांची तपासणी करण्यासाठी अमरावतीचे पथक महागांवात
तालुक्यात बोगस औषधी, खतांची विक्री जोमात
महागांव तालुक्यात मागील काही महिन्यापासून बोगस कंपनीच्या औषधी व बोगस खतांची विक्री जोमात सुरू आहे. याचा सुगावा अमरावती पथकाला लागताच त्यांच्यामार्फत महागांव शहरातील काही कृषी चालकाची तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये काही औषधी, खतांचे नमुने अमरावती पथकाच्या अधिकाऱ्यांनी सोबत घेतले आहेत.
अमरावती येथील विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक यांच्या पथकाने महागांव शहरात काल मोहीम राबविला. त्यामध्ये काही कृषी केंद्र चालकांची तपासणी करण्यात आली. व त्यामध्ये काही कृषी केंद्र चालकांच्या गोडाऊन वरून औषधी व खतांचे नमुने घेण्यात आले. ताब्यात घेतलेले नमुण्याचे निरीक्षण प्रायोगिक लॅब मध्ये झाल्यानंतर त्यांच्यावर काय कारवाई करण्यात येईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कृषी चालकांची तपासणी करण्यासाठी अमरावतीचे पथक महागांवात तालुक्यात बोगस औषधी, खतांची विक्री जोमात
Bhagirath Raja 24 News.com
0



إرسال تعليق