⚡ ब्रेकिंग News

ढाणकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालयांमध्ये श्रेणी वर्धन करा.!

ढाणकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालयांमध्ये श्रेणी वर्धन करा.!
प्रहारची जिल्हा शल्य चिकित्सक यांना मागणी ढाणकि येथील आरोग्य केंद्रात रुग्णांना कुठल्याच प्रकारचे आरोग्य विषयक चांगल्या सुविधा उपलब्ध नसल्याने येथे येणाऱ्या गोरगरीब रुग्णांचे प्रचंड हाल होत असल्याने सामान्य गोरगरीब रुग्ण त्रस्त झाले आहे. अनेक वेळा प्राथमिक आरोग्य केंद्रात औषध साठ्याचा तुटवडा निर्माण होत असल्याने रुग्णांना खाजगी मेडिकल वरून औषधी आणावी लागत आहे . त्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे . प्राथमिक आरोग्य केंद्रात गोळ्या औषधे तज्ञ डॉक्टर ,औषधी संयोजक यांचा अभाव असल्याने सामान्य रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सध्या सर्दी, खोकला, डायरीया,ताप या आजाराने डोके वर काढले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात साथीचे रोग आजार, संसर्गजन्य आजारावर औषध उपचार केला जातो तसेच बाह्य रुग्ण विभागात सर्दी ,खोकला ,ताप या आजारावर तपासून औषध दिले जाते. पण चांगली आरोग्यविषयक सोयी सुविधा मिळत नसल्यामुळे खाजगी दवाखान्यात रुग्णांना उपचारासाठी जावे लागत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याने लसीकरण करण्यास अडचणी निर्माण होत आहे. नवीन इमारतीत स्थलांतरित होऊन ही अनेक महिन्यांपासून एकही प्रस्तुती होऊशकली नाही. कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया सुद्धा झाली नाही.त्यामुळे रुग्णांची हेडसांड होत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील अनेक पदे रिक्त आहेत आरोग्य सेवक, आरोग्य सेविका ,औषधी संयोजक ,नेत्र चिकित्सक , रुग्णवाहिका चालक हि अनेक महत्त्वाची पदे रिक्त आहेत. त्यामुळे इथे असलेल्या कर्मचाऱ्यांवर ताण वाढत आहे. आज रोजी ढाणकी शहराला निगडित असलेले प्राथमिक आरोग्य केंद्रावर 65 हजार लोकसंख्येचा भर असून सभोवतालच्या परिसरातील नागरिकांचा दररोज आरोग्य संबंधित काम करिता संपर्क येत असतो. सदर प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज 200 ते 300 रुग्णांची तपासणी होते. रुग्णांना सदर आरोग्य केंद्रात रुग्णसेवा मिळत नसल्याने त्यांना उमरखेड, यवतमाळ, नांदेड या ठिकाणी उपचार घेण्यासाठी जावे लागते. तेव्हा आजची लोकसंख्या तसेच ढाणकीला लागून असलेली गावांची लोकसंख्या व रोजचा जनसंपर्क व रुग्णांची संख्या लक्षात घेता तात्काळ ढाणकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची 30 खाटांचा ग्रामीण रुग्णालयांमध्ये श्रेणी वर्धन करावे या करिता जिल्हा शैल्य चिकित्सक यवतमाळ यांना प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने निवेदन देऊन मागणी करण्यात आली. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका प्रमुख सय्यद माजीद उपतालुकाप्रमुख गोपाल झाडे, उमरखेड शहर प्रमुख राहुल मोहितवार,उमरखेड शहर सचिव श्याम चेके ,उमरखेड शहर सहसचिव अभिजीत गंदेवार ,आदि प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. चौकट :- *अन्यथा आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागेल -तालुका प्रमुख सय्यद माजीद* ढाणकी येथील आरोग्य केंद्राचे 30 घाटांचे ग्रामीण रुग्णालयामध्ये श्रेणी वर्धन करण्यासाठी तात्काळ प्रशासनाने व संबंधित विभागाने पावले उचलावी अन्यथा येत्या काही दिवसात आमरण उपोषणास बसेल असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे उमरखेड तालुका प्रमुख सय्यद माजिद यांनी सदर निवेदनातून दिला आहे.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...