*आरक्षण बचाव यात्रा जल्लोषात संपन्न*
*शंभर ओबीसी आमदार निवडून आणा*
- एड.प्रकाश आंबेडकर.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे आरक्षण बचाव यात्रेच्या निमित्ताने यवतमाळ येथे शेकडो वाहनांच्या ताफ्यासह आगमन झाले.
मराठा आणि आदिवासी समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नांवर भाष्य करताना बाळासाहेब आंबेडकर म्हणाले की गरीब मराठ्यांना आरक्षण देण्यास वंचित बहुजन आघाडीची भूमिका अनुकूल असून आरक्षण देताना ओबीसीच्या कोट्यातून न देता स्वतंत्रपणे देण्यात यावे याचा पुनरुच्चार केला.
तर आरक्षणाच्या प्रश्नासोबतच आता नव्यानेच सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती जमातींना क्रिमिलियर लावण्याचा जो निर्णय जाहीर केला, ही अतिशय धोक्याची घंटा आहे. सर्वोच्च न्यायालयाने एससी,एसटीचे उपवर्गीकरण करण्याचे अधिकार राज्याला दिले असून नवीन विधानसभा अस्तित्वात आल्यावर ओबीसी आरक्षणाचा धोका वाढणार आहे. जात जनगणना करण्या
साठी समिती गठीत केली जाईल,आणि आयोगाचा अहवाल आल्याशिवाय आरक्षण लागू करता येणार नाही, अशी भूमिका सरकार घेईल आणि अशा पद्धतीने ओबीसीला बळीचा बकरा बनवले जाईल. ओबीसी समाजाने हा निर्णय हाणून पाडण्याकरता विधिमंडळात आपले 100 ओबीसी आमदार निवडून पाठवले पाहिजे. त्यासाठी ओबीसींनी आरक्षणाच्या बाजूने असणाऱ्या पक्षाच्या
बाजूने उभे राहिले पाहिजे
असे प्रतिपादन एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी केले.
या कार्यक्रमात अलंकृता नीरज वाघमारे या मुलीने आपल्या खाऊच्या पैशातून वंचित बहुजन आघाडी या पक्षाला एक लाख रुपयांची देणगी दिली.
तथा यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर नीरज वाघमारे यांनी आपल्या रक्ताने बाळासाहेबांची रेखाटलेली प्रतिमा बाळासाहेबांना भेट देऊन पक्षाप्रती असलेली आपली निष्ठा व्यक्त केली.
ओबीसी नेते अविनाश
भोसीकर, मोहन राठोड व पक्षाचे निरीक्षक प्रियदर्शी तेलंग यांनी आपले विचार व्यक्त केले. मंचकावर महिला आघाडीच्या अध्यक्षा धम्मवती ताई वासनिक, महासचिव पुष्पाताई शिरसाठ जिल्हा महासचिव सरला चचाने, वंचितचे महासचिव मिलिंद पाटील, आणि उपाध्यक्ष मंगल तेलंग, धाडी बंजारा नेते शैलेश भानवे, युवा आघाडीचे अध्यक्ष आकाश वाणी,गोंडवाना गणतंत्रचे दिलीप शेडमाके, विशाल वाघ,आदिवासी नेते. विजयाताई रोहनकर.समता पर्वचे अध्यक्ष- दीपक नगराळे, आंबेडकरी साहित्य अकादमीचे अध्यक्ष-कवडूजी नगराळे, गुरुदेव सेवा मंडळाचे- पुरुषोत्तम काळे, महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचचे-रमेशजी जारंडे ,विरू बापू माटेगावकर संघटनेचे प्रमोद मेटांगे मंचावर स्थानापन्न झाले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
प्रास्ताविक भाषणात डॉ.नीरज वाघमारे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात आरक्षण बचाव यात्रेची भूमिका स्पष्ट केली.
श्री शिवदास कांबळे, जिल्हा महासचिव यांनी सूत्रसंचालन केले.
आभार प्रदर्शन संघपाल कांबळे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका अध्यक्ष- संघपाल कांबळे, प्रफुल शंभरकर, विनोद वासे, विलास करमणकर,अफसर काझी, गौतम दारुंडे, हरीश पाते, मधुकर कांबळे. आकाश वाणी-युवा आघाडी अध्यक्ष, रत्नमाला कांबळे, मीना रणीत, सविता तिडके, प्रमोद पाटील,भारती सावते, विलास वाघमारे, गजानन सावळे,शहराध्यक्ष नामदेव इंगोले, प्रसेनजित भवरे, सुधीर खोब्रागडे इत्यादीने परिश्रम घेतले.
*आरक्षण बचाव यात्रा जल्लोषात संपन्न* *शंभर ओबीसी आमदार निवडून आणा*
Bhagirath Raja 24 News.com
0




إرسال تعليق