*महावीर इंटरनॅशनल यवतमाळ केंद्र द्वारा मोफत कृत्रिम अवयवांची मूल्यांकन आणि पूर्व नोंदणी शिबिर आयोजन*
यवतमाळ :- महावीर इंटरनॅशनल सेवा केंद्र ट्रस्ट नागपूर व महावीर इंटरनॅशनल यवतमाळ केंद्र व रायसोनी ग्रुपचा संयुक्त विद्यमाने चळवळीतील एक नवीन अध्याय मोफत कृत्रिम अवयवांचे मूल्यांकन आणि पूर्व नोंदणी शिबिर दिनांक 9 ऑगस्ट 2024 सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत स्थानीय टिंबर भवन स्टेट बँक चौक धामणगाव रोड यवतमाळ येथे आयोजित केले आहे. या शिबिरामध्ये आमची तज्ञ चमू तुमच्या गरजा आणि कृत्रिम अवयवासाठी पात्रतेचे मूल्यांकन करेल. पात्र व्यक्तीस कृत्रिम अवयव वितरण प्रक्रियेसाठी पूर्व नोंदणी केली जाईल. कृत्रिम अंग तंतोतंत बसण्यासाठी योग्य मापाचे असल्याची खात्री करण्यासाठी आम्ही आवश्यक मोजमाप करू यासाठी महत्त्वाची कागदपत्रे आधार कार्डची झेरॉक्स पासपोर्ट आकाराचे दोन फोटो नोंदणीसाठी सम्पर्क नम्बर
895 6114 555
सर्व पात्र रुग्णांना कृत्रिम अवयव वितरण तारीख 22 ते 24 ऑगस्ट 2024 अग्रसेन भवन रवी नगर नागपूर येथे वितरित होईल. यासाठी यवतमाळ ते नागपूर पर्यंत 50% बस टिकीट भाडे देण्यात येईल. सहज सुलभ हालचाल आणि स्वतंत्र जीवनाकडे पहिले पाऊल टाकण्याची एक संधी आहे या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन महावीर इंटरनॅशनल यवतमाळ केंद्राचे अध्यक्ष प्रवीण निमोदीया, सचिव शोभा दोडेवार,कोषाध्यक्ष शेखर बंड, झोन कोषाध्यक्ष हर्षल एंबरवार, उपाध्यक्ष राजेश भूत व शिवम भूतानी तसेच महावीर इंटरनॅशनल केंद्र यवतमाळ केंद्राचे सदस्य यांनी केले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी
शरद निमोदिया, रवी नीमोदिया , मनोज अग्रवाल, प्रदिपसिंग नन्नरे, डॉ. आनंद भंडारी, महेंद्र बोरा, उमेश पोद्दार, श्याम भन्साली ,विजय चानेकर , विनोद महाजन, उमेश पकाले , जवाहर कोठारी, उज्वला भाविक, संगीता पिपराणी , डॉ ललिता घोडे, चंचल कोठारी, ऍड. रीना वर्मा, शिवानी गुगलीया , सुलभा चाणेकर, वर्षा चव्हाण इत्यादी कार्यकर्ते प्रयत्नशील आहे
महावीर इंटरनॅशनल यवतमाळ केंद्र द्वारा मोफत कृत्रिम अवयवांची मूल्यांकन आणि पूर्व नोंदणी शिबिर आयोजन*
Bhagirath Raja 24 News.com
0


إرسال تعليق