⚡ ब्रेकिंग News

'पारंपारिक शिक्षण घेणाऱ्या मुलींनाही मोफत शिक्षण योजना लागू करा'*

*छात्रभारती विध्यार्थी संघटनेचे पुसद तहसीलदारांना निवेदन* *'पारंपारिक शिक्षण घेणाऱ्या मुलींनाही मोफत शिक्षण योजना लागू करा'*
पारंपारिक शिक्षण घेणाऱ्या मुलींनाही शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती देण्याचा निर्णय जाहीर करावा, अशी मागणी छात्रभारती बुलढाणाच्या वतीने ६ ऑगस्ट रोजी निवेदन देऊन करण्यात आली. कला, शास्त्र व वाणिज्य या शाखांमध्ये प्रवेश घेणाऱ्या सर्व अभ्यासक्रमांना या योजनेतून वगळल्यामुळे 12 लाखांपेक्षा अधिक पारंपरिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींचे नुकसान होणार आहे.
त्यामुळे व्यावसायिक शिक्षणासोबतच पारंपरिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींनाही शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती करण्यात यावी, अशी मागणी तहसीलदारांद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन करण्यात आली. यावेळी छात्रभारती पुसद तालुका अध्यक्ष भूषण ढोले, उपाध्यक्ष चेतन रंगारी, तालुका संघटक केशव पाटमोरे आणि इतर अन्य कार्यकर्ते उपस्थित होते सदर निवेदन छात्रभारती विध्यार्थी संघटनेचे राज्यध्यक्ष रोहित ढाले, छात्रभारती विध्यार्थी संघटना यवतमाळ चे राज्यकार्यकारणी सदस्य राजु गायकवाड तथा यवतमाळ चे जिल्हाध्यक्ष प्रशांत खंदारे यांच्या मार्गदर्शनात पुसद येथील तहसीलदार यांना देण्यात आले.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...