आरक्षण वाचवायच असेल तर लढाव लागेल.
येणाऱ्या पिढीसाठी संघर्ष करा.
आर्णी
संपूर्ण महाराष्ट्रात आरक्षण बचाव यात्रा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात सुरू आहे.विविध जिल्ह्यात सभा व कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले त्याच प्रमाणे आर्णी शहरात आरक्षण बचाव यात्रा दाखल झाली.समाजातील शांतता अखंडित राहावी या करीता सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे.महाराष्ट्रातील ओबीसी व मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटून उठला असताना मराठ्यांचे व ओबिसींच्या आरक्षणाचे ताट वेगळे असायला हवे या प्रकारची भूमिका दुसर कोणी मांडायला तयार नाही आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकीय प्रस्थापित पक्ष गप्प आहे.तुम्हाला प्रश्न पडला असेल आपल्याला आरक्षणाचे काय आपण तर वयाचा अर्धा टप्पा गाठला,शिक्षणाचे वय राहले नाही,नोकरीचे वय राहले नाही मात्र आपल्याला येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी लढाव लागेल प्रकाश आंबेडकरांनी असे सांगत तुम्हाला आरक्षण टिकल पाहिजे असे वाटते न ? असा महत्त्वपूर्ण प्रश्नही विचारला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वंचित बहुजन आघाडी चे तालुका अध्यक्ष प्रशिक मुनेश्वर यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्येष्ठ सल्लागार उत्तम मुनेश्वर यांनी केले.आर्णी शहरात आगमन होताच दिग्रस रोड वर ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले.कॉर्नर सभेच्या स्थळी विविध ओबीसी संघटना,विविध एस.टी.संघटना व विविध एस.सी. संगठनांनी ही हजेरी लावली. मंचकावर उपस्थित वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर,ओबीसी नेते अविनाश भोसीकर व यवतमाळ जिल्हा निरीक्षक प्रियदर्शी तेलंग यांनी उपस्थितांना संबोधित केले तसेच यवतमाळ जिल्ह्याचे मा.निरीक्षक मोहन राठोड,जिल्हाध्यक्ष पांडुरंग मेश्राम,महासचिव डी.के.दामोधर यांच्या सह आदी मंचावर उपस्थित होते.आरक्षण बचाव यात्रेच्या कॉर्नर सभेच्या यशस्विते करीता वंचित बहुजन आघाडी,वंचित बहुजन महिला आघाडी,वंचित बहुजन युवा आघाडी व समाज बांधवांनी परिश्रम घेतले.
आरक्षण वाचवायच असेल तर लढाव लागेल. येणाऱ्या पिढीसाठी संघर्ष करा.
Bhagirath Raja 24 News.com
0


टिप्पणी पोस्ट करा