⚡ ब्रेकिंग News

आर्णी तालुकास्तरीय राष्ट्रीय विज्ञान नाट्य महोत्सव उत्साहात

आर्णी तालुकास्तरीय राष्ट्रीय विज्ञान नाट्य महोत्सव उत्साहात
■ श्री गुरुदेव विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय जवळा येथे आयोजन 🔸सनराईज इंग्लिश मेडियम स्कुल आर्णीने मारली बाजी यवतमाळ : प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर व राष्ट्रीय विज्ञान नाट्य महोत्सव २०२४- २०२५ अंतर्गत आर्णी तालुकास्तरीय विज्ञान नाट्य महोत्सवाचे आयोजन 13 ऑगस्ट ला श्री गुरुदेव विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय जवळा येथे करण्यात आले. राष्ट्रीय विज्ञान नाट्य स्पर्धेचा यावर्षीचा विषय मानव कल्याणासाठी विज्ञान व तंत्रज्ञान असा आहे. या नाट्य महोत्सवात आर्णी येथील सनराईज इंग्लिश मेडियम स्कुल च्या चमुने आर्टिफिशियल इंटेलिजन्स विषयावर सादर केलेल्या इंग्लिश नाटिकेने बाजी मारून प्रथम पारितोषिक मिळविले. या कार्यक्रमाला उपशिक्षणाधिकारी निता गावंडे मॅडम, उपशिक्षणाधिकारी योजना शिल्पा पोलपेत्तीवार मॅडम, आर्णी चे गटशिक्षणाधिकारी मोहम्मद इक्बाल साहेब, गुरुदेव सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळ जवळा चे अध्यक्ष श्री गजाननराव सोळंके सर, सचिव श्री गणेशभाऊ मोरे, प्राचार्य श्री चव्हाण सर उपस्थित होते.
केंद्रप्रमुख श्री गजानन शेलोकार सर, साधन व्यक्ती राऊत मॅडम, माधुरी चंद्रे मॅडम तसेच तालुक्यातील सहभागी शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक देखील उपस्थित होते. नाट्यमहोदत्सवात आर्णी तालुक्यातील विविध शाळांच्या नाट्य चमुंनी सहभाग नोंदवून आपल्या कलाकृतीचे दर्शन घडविले. विज्ञान नाट्योत्सवामध्ये विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विज्ञान नाटिकांचे परिक्षण श्रीमती प्रतिभाताई गेडाम, ज्योती लांडे मॅडम आणि श्री तुकाराम चव्हाण सर यांनी वस्तुनिष्ठपणे केले. यामध्ये सनराईज इंग्लिश मेडियम स्कुल आर्णी या शाळेनी प्रथम क्रमांक आणि जि.प.हायस्कुल लोनबेहळ यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला. मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री गुरुदेव विद्यामंदिर जवळा चे सर्व शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी आणि तालुक्यातील शिक्षकांनी विशेष सहकार्य केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...