⚡ ब्रेकिंग News

तालुकास्तरीय क्रीकेट मध्ये सनराईज शाळेने मारली बाजी.

तालुकास्तरीय क्रीकेट मध्ये सनराईज शाळेने मारली बाजी.
आर्णी तालुकास्तरीय (१७) सतरा वर्षा आतिल क्रीकेट टीमची निवड करण्यासाठी क्रीकेट चे सामने घेण्यात आले. यामध्ये सनराईज शाळेने बाजी मारली. आता जिल्हा स्तरीय क्रीकेट चे सामने पांढरकवडा येथे होणार आहे. गुरुदेव विद्यालय जवळा व सनराईज शाळा आर्णी मध्ये फायनल सामना झाला. यात सनराईज शाळेची चमूने बाजी मारली. जिल्हास्तरीय साठी तालुक्यांच्या या विजयी ठरलेल्या टीमची निवड झाली.
त्यामध्ये सनराईज शाळेचे विद्यार्थी अभिनवसिंह हरिओमसिंह बघेल, सोहम संजय संगनवार, उत्कर्षसिंह ईश्वरसिंह बघेल, पियुष प्रदीप बहीरमकर, संस्कार सुरज जयस्वाल, भीमाशिष कीशोर भगत, शौर्य शैलेंद्र शुक्ला, कौस्तुभ मनोज चव्हाण, आरुष रविन्द्र पित्तलवार, निल बंडू चव्हाण, शाश्वत लिलाधर ठाकरे, वेदांग प्रविण लाड, कॄष्णा नितीन सोने. यांचा यात समावेश आहे. सनराईज शाळेचे क्रीडा शिक्षक संदीप वडूरकर, जय खोडके,सुधिर पतंगे या सर्वाचे शाळेच्या उपमुख्याध्यापिका तेजस्वीनी ढोले, मुख्याध्यापक अशोक कोठारी यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...