तलाठ्यांचे तीव्र आंदोलन; तलाठी आता सामूहिक बेमुदत रजेवर
मागण्या मान्य न झाल्याने तलाठी आता सामूहिक बेमुदत रजेवर
आर्णी गणेश एकंडवार
संपूर्ण महाराष्ट्रातील महसूल प्रशासनातील अति महत्त्वाचा कणा म्हणून तलाठ्याकडे पाहिले जाते परंतु अनेक दिवसापासून त्यांच्या मागण्या प्रलंबित असून यासाठी तलाठी यांचे आंदोलन सुरू आहे. दिनांक 11 सप्टेंबर ला जिल्ह्यातील सर्व तलाठ्यांनी डीएससी जमा केली आहे. नैसर्गिक आपत्ती व निवडणुकीची कामे वगळता सर्व कामावर त्यांनी बहिष्कार टाकला होता. परंतु एवढे दिवस उलटूनही मागण्या मान्य न झाल्याने शेवटी जिल्ह्यातील सर्व तलाठ्यांनी आपले आंदोलन आणखी तीव्र करत आज दिनांक 24 सप्टेंबर पासून सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाने तलाठ्याची कालबाह्य झालेले लॅपटॉप, प्रिंटर, डीए ससी कार्यालयाचे थकीत असलेले भाडे, तलाठी संवर्गातील पदोन्नती गेल्या १५ वर्षापासून मंडळाधिकारी पदावर पदोन्नती करण्यात आलेली नाही. अशा विविध मागण्या प्रलंबित असून याच मागण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना विदर्भ पटवारी संघाचे निवेदन सादर केले परंतु शासनाने कोणत्याही ठोस निर्णय घेतला नाही. त्यामुळे नाईलाजास्तव विदर्भ पटवारी संघ नागपूर शाखाच्या वतीने माननीय तहसीलदार यांना लेखी निवेदन सादर करून जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत बेमुदत रजेवर जात असल्याची माहिती निवेदनातून दिली आहे. यावेळी उपविभागाचे अध्यक्ष कैलास वाकेकर, उपाध्यक्ष ममता पवार, तलाठी सचिन मेश्राम, प्रमोद जाधव, आर एम चौधरी, सी जी पांडे, वाय आर सावरकर, व्ही एस सोनुने, जे एस खोडे, जी व्ही मिठे, आरती हनुमंते, किरण खैरे, बी आर कुथे, अमोल पुरी, श्याम मंडाळे, प्रवीण ताकसांडे, सुनील राठोड, प्रकाश राऊत यांच्या सह इतर तलाठी उपस्थित होते.
तलाठ्यांचे तीव्र आंदोलन; तलाठी आता सामूहिक बेमुदत रजेवर
Bhagirath Raja 24 News.com
0




टिप्पणी पोस्ट करा