⚡ ब्रेकिंग News

कामगारांना तालुकास्तरावर सुरक्षा व अत्यावश्यक संच वाटप

कामगारांना तालुकास्तरावर सुरक्षा व अत्यावश्यक संच वाटप यवतमाळ, दि.25 : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्यावतीने जिल्ह्यातील नोंदीत जीवित पात्र बांधकाम कामगारांना सुरक्षा व अत्यावश्यक संच तालुकास्तरावर वाटप करण्यात येणार आहे. यासाठी कामगारांनी संबंधित कंपनीच्या प्रतिनिधींशी संपर्क साधावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मंडळामध्ये नोंदीत जीवित पात्र कामगारांची नोंदणी दिनांकानुसार यादी तयार करण्यात आली आहे. या कामगारांना ९५२९८०६९१२ व ९५२९८१४१४९ या मोबाईल क्रमांकावर कंपनीच्या प्रतिनिधींशी संपर्क साधून साहित्य वाटपाची माहिती प्राप्त करून घ्यावयाची आहे. तालुकास्तरावरील नियोजित जागेवर ज्या दिनांकास कामगारांना प्रतिनिधींकडून बोलविण्यात येईल त्या दिवशी सदर ठिकाणी सकाळी १० वाजता उपस्थित राहावयाचे आहे. मंडळाचे संबंधित मूळ कागदपत्र यावेळी सोबत ठेवणे आवश्यक आहे. वाटपाच्या ठिकाणी बायोमेट्रिक केल्यानंतर सुरक्षा संच व अत्यावश्यक संच उपलब्ध होणार आहे. ज्या कामगारांचा कंपनीच्या प्रतिनिधींशी संपर्क होईल आणि ज्यांना साहित्यासाठी बोलविण्यात आले आहे, अशाच कामगारांनी संच वितरणाच्याठिकाणी उपस्थित रहावे. मंडळाची सदर योजना निशुल्क असून त्रयस्थ व्यक्तीद्वारे दिशाभूल, फसवणूक होत असल्यास नजीकच्या पोलिस स्टेशनमध्ये रितसर तक्रार दाखल करावी, असे सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...