मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त आर्णी येथे रक्तदान शिबीर

मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त आर्णी येथे रक्तदान शिबीर आर्णी येथे रक्तदानाने ईद साजरी करणार
ईद ए मिलादून्नबी (मोहम्मद पैगंबर जयंती) निमित्त आर्णी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. ईद ए मिलादून्नबी रक्तदान समिती ही सामाजिक संघटनांची संयुक्त समिती या उपक्रमाची आयोजक असून शिबिराकरिता वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयाची चमू येणार आहे. रक्तदान शिबिर ईद च्या एक दिवस आधी दिनांक १५/०९/२०२४ रविवार ला सकाळी ९:०० वाजेपासून दुपारी ३:०० वाजेपर्यंत आर्णी शहरातील मेमन मस्जिद जमातखाना येथे होणार आहे. रक्तदान हे जीवनदान असून मोठ्या प्रमाणात रक्तदान करून मोहम्मद पैगंबर जयंती (ईद) साजरी करावी असे आवाहन आर्णी मेमन जमात, जकात वेल्फेअर फाऊंडेशन, जमीयत उलेमा ए हिंद, अल्पसंख्याक कर्मचारी संघटना, अल हक ग्रुप, नवजवानाने उपरास मोहल्ला, मोमीनपुरा सोशल ग्रुप, फैजाने सुफी मल्टिपरपज सोसायटी, व्हिजन मल्टिपरपज सोसायटी, नॅशनल क्लब, भारतीय मुस्लिम सेवा संघ व इतर सामाजिक संघटनांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...