⚡ ब्रेकिंग News

राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन साजरा

राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन साजरा
स्व.भारत सिंह ठाकूर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय जवळा तालुका आर्णी जिल्हा यवतमाळ राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन साजरा करण्यात आला दिनांक 24 सप्टेंबर 2024 रोज मंगळवार लां आयोजित कार्यक्रमा चे अध्यक्षस्थानी प्रा पुरुषोत्तम ठाकरे हे होते. तर कार्यक्रमांमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेची स्थापना त्याचे कार्य आणि राष्ट्र विकासामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेची उपयोगिता याबाबतची माहिती कार्यक्रमाधिकारी प्रा.ज्योतिपाल देशपांडे यांनी दिली.
समाज आणि राष्ट्र घडविण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना किती महत्त्वाची आहे. याविषयी प्रा. मयूर जाधव यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. अणिस सोलंकी यांनी केले. या कार्यक्रमाचे नियोजन प्राचार्य डॉक्टर विलास राऊत यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय सेवा योजनेच्या पथकाने केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयीन विद्यार्थी यांची उपस्थिती होती सदर कार्यक्रमा साठी प्रा. मीनाक्षी लोखंडे प्रा. साक्षी काटकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...