पोलीस स्टेशन आर्णी येथे येणाऱ्या सन उत्सव निमित्ताने शांतता सभा संपन्न
विविध विषयावर झाली चर्चा
आर्णी (गणेश एकंडवार): पोलीस स्टेशन येथे आगामी येणाऱ्या गणेश उत्सव व दुर्गा देवी या सण-उत्सवा निमित्ताने आयोजित शांतता सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमात सभेचे अध्यक्ष म्हणून सहाय्यक पोलीस अधीक्षक चिलुमुला रजनीकांत होते. आर्णी तालुका हा धार्मिक, सामाजिक एकोप्यासाठी ओळखला जातो. येथे सर्व धर्म समाजाचे सण-उत्सव एकत्रित साजरे करण्याची अविरत परंपरा लाभली आहे.
आगामी उत्सव हे शांततेत पार पडावे, पोलीस व नागरिकांत चांगला सामंजस्य राहावे या उद्देशाने आर्णी पोलीस स्टेशन च्या वतीने शांतता सभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सहाय्यक पोलीस अधीक्षक होते. त्यावेळी पोलीस निरीक्षक केशव ठाकरे सह पोलीस अधिकारी, कर्मचारी, पोलीस पाटील पत्रकार व उत्सव साजरे करणारे नागरिक उपस्थित होते.
▪️नियम तोडणाऱ्या वर कारवाई होणार
संबंधित मंडळ पदाधिकारी यांनी काळजी घ्यावी की कोणत्याही प्रकारच्या नियमाचे उल्लंघन होणार नाही जर नियमाचे उल्लंघन कोणी करत असेल तर पोलीसांचे लक्ष सर्व मंडळावर असणार आहे. त्यामुळे पोलीस कोणतीही हयगय न करता सर्व नियम तोडणाऱ्या वर कारवाई करण्षठयात येईल.
-सहाय्यक पोलीस अधीक्षक, चिलुमुला रजनीकांत
▪️पैसे डिजेवर खर्च करण्यापेक्षा अन्नदान किंवा शिक्षणावर करावा
अनेक मंडळ आहेत जे विसर्जन मिरवणुकीत डि. जे लावतात त्यात त्यांचे लाखो रुपये खर्च होतात परंतु त्या मंडळ सदस्यांनी डि. जे वर पैसे खर्च करण्यापेक्षा एखादी तुटलेली शाळा दुरुस्त करावी, पुस्तक वाटप करावे किंवा एखाद्याला शिक्षणासाठी त्याला आर्थिक मदत करावी आमच्या कडून काही मदत लागत असेल तर आम्ही नक्कीच सहकार्य करू.
-केशव ठाकरे, ठाणेदार आर्णी
पोलीस स्टेशन आर्णी येथे येणाऱ्या सन उत्सव निमित्ताने शांतता सभा संपन्न
Bhagirath Raja 24 News.com
0




टिप्पणी पोस्ट करा