बंजारा समाजाने ऐतिहासिक सोहळ्याचे स्वाक्षरी व्हा
आर्णी गणेश एकंडवार
बंजारा समाजाची काशी बंजारा तीर्थक्षेत्र पोरादेवी येथील बंजारा समाजाच्या गौरवशाली इतिहासाची नव्यापिढीला माहिती व्हावी, यासाठी तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे पालकमंत्री ना. संजय राठोड यांच्या अतुट प्रयत्नाने 'विरासत ए बंजारा' संग्रहालय उभारले गेले आहे. त्याचे काम सध्या पूर्ण झाले आहे. येत्या 5 ऑक्टोंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण सोहळा होणार आहे
बंजारा समाजाची काशी तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथील नंगारा भवनामध्ये बंजारा समाजाचा इतिहास रचला आहे. विरासत
सामाजिक कार्यकर्ते राहुल राठोड यांचे आवाहन
ए-बंजारा वास्तू संग्रहालयात एकूण १३ गॅलरी तयार करण्यात आल्या आहे. प्रत्येक गैलरीत विविध प्रकारचे देखावे आणि
चित्रांच्या सहाय्याने बंजारा समाजाचा संपूर्ण इतिहास रचला गेला आहे. या नंगारा भवनाचा लोकार्पण सोहळा येत्या दिनांक 5 ऑक्टोंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री ना. संजय राठोड, इतर मंत्री, साधू-संतांसह मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या ऐतिहासिक सोहळ्याला सर्व बंजारा समाज बांधव व भगिनींनी उपस्थित राहून साक्षीदार व्हा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते, राहुल राठोड सेवानगर (कासारबेहळ) यांनी केले आहे.
बंजारा समाजाने ऐतिहासिक सोहळ्याचे स्वाक्षरी व्हा
Bhagirath Raja 24 News.com
0

टिप्पणी पोस्ट करा