दर्डा विधी महाविद्यालयात पदवीदान समारंभ तथा माजी विद्यार्थी मेळावा

दर्डा विधी महाविद्यालयात पदवीदान समारंभ तथा माजी विद्यार्थी मेळावा
यवतमाळ : विद्या प्रसारक मंडळ संचालीत स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा विधी महाविद्यालयात नुकताच पदविदान सोहळा संपन्न झाला. सदर कार्यक्रमाला प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. नागेश न्हावकर मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी विद्या प्रसारक मंडळाचे सचिव सी.ए.प्रकाश चोपडा होते. त्याचसोबत वरीष्ठ विधीज्ञ ए.पी. दर्डा , वरीष्ठ विधीज्ञ आर. के. मनक्षे ,विप्र मंडळाचे सहसचिव विधीज्ञ महेंद्र ओसवाल , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजेश मुणोत व नॕक समन्वयक डॉ. संदीप नगराळे यांची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी न्यायाधीश नागेश न्हावकर यांनी विधी पदवीधारक तथा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हटले कि विधी व्यवसायात पदार्पण करणे सोपे आहे परंतु व्यवसायात टिकुन राहण्यासाठी सचोटी तसेच परीश्रम करणे महत्त्वाचे असते. भारताचे संविधान जगात सर्वोत्तम आहे आणि त्यातील मुल्ये ,अधीकार ,कर्तव्ये जपणे हे सर्व नागरिक आणि विधी व्यावसायिकांचे काम आहे. यावेळी त्यांनी नवोदीत वकिलांना पुढील उज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष सी.ए. प्रकाश चोपडा यांनी व्यावसायिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नवोदीत वकिलांनी तयार राहण्याचे आवाहन केले. विधी व्यवसायात प्रचंड संधी असून नाव आणि वित्त कमावण्याचे तसेच गरजूंना न्याय देऊन आत्मिक आनंद प्राप्त करण्याचे आवाहन केले. सांविधानीक तरतूदींनी देश एकसंघ ठेवला आहे त्या देशाप्रती समर्पीत असावे हि भुमिका मांडली. यावेळी वरिष्ठ विधीज्ञ आर. के. मनक्षे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सुरवातीला प्राचार्य डॉ. विजेश मुणोत यांनी प्रास्तविक केले तर आभार प्रदर्शन डॉ. संदीप नगराळे यांनी केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. योगिता बोरा आणि अक्षिता जयस्वाल यांनी केले. यावेळी मोठ्या संखेने विद्यार्थी उपस्थित होते . कार्यक्रमानंतर माजी विद्यार्थी मेळाव्याचे यशस्वी आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाला डॉ. वैशाली फाळे, डॉ. स्वप्नील सगणे, प्रा. वंदना पसारी, प्रा. हांडे, प्रा. मुंधडा, अॅड.अगमे, प्रा. कन्नाके, प्रा. आड़े, प्रा. शबनम, प्रा. आगरकर, अॅड. भोयर, अॅड. घाडगे, डॉ. ढेरे, ग्रंथपाल ठाकरे, ईतर शिक्षक व तसेच श्री. अजय दर्डा, श्री. गौरखेडे, वानखेड़े, कदम, राठोड, चितार्लेवार, कुमरे इ. शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे योगदान लाभले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...