जवाब दो आंदोलनाला कामगाराचा प्रचंड प्रतिसाद. डॉ विष्णू उकंडे यांच्या नेतृत्वात आर्णी घाटंजी केळापूर येथील ग्रामपंचायत ला एल्गार

जवाब दो आंदोलनाला कामगाराचा प्रचंड प्रतिसाद.
डॉ विष्णू उकंडे यांच्या नेतृत्वात आर्णी घाटंजी केळापूर येथील ग्रामपंचायत ला एल्गार
आठ दिवसांचा अल्टीमेट महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाच्या वतीने कामगारासाठी अतिशय चांगल्या योजना असून त्यासाठी कामगार कार्ड आवश्यक आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यवतमाळ यांनी सदर ९० दिवसाच्या प्रमाणपत्रावर ग्रामसेवक यांनाच सह्या करण्याचे अधिकार असल्याने ग्रामसेवकांनी 90 दिवसाचे प्रमाणपत्र देण्यासंदर्भात पत्र दिले होते . परंतु सदर शासन निर्णय तथा जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पत्राला न जुमानता आर्णी घाटंजी केळापूर विधानसभेतील ग्रामसेवकांनी सदर कामगारांना प्रमाणपत्र देण्यास नकार दिलेला असून ते 90 दिवसाच्या प्रमाणपत्रावर सह्या करत नाही.
त्यामुळे अनेक कामगार लाभापासून वंचित रहावे लागते. या विरोधात डॉ विष्णू उकंडे यांच्या नेतृत्वात आर्णी घाटंजी केळापूर येथील शेकडो ग्रामपंचायत वर कामगारांनी जवाब दो आंदोलन केले. ग्रामसेवकांना सदर शासन निर्णय तथा मुख्यकार्यकारी अधिकारी यांचे पत्र देऊन जवाब दो आंदोलनाद्वारे उत्तर मागण्यात आले. यावेळी आर्णी घाटंजी केळापूर तालुक्यात ग्रामपंचायत ला निवेदन देण्यात आले असून काही ग्रामपंचायत ला पुढील दोन दिवसात निवेदन देण्यात येणार आहे. जवाब दो आंदोलन शुभारंभ प्रसंगी डॉ विष्णू उकंडे यांनी जवळा कोपरा तेंडोळी येथे प्रत्यक्ष भेट देऊन कामगारांशी संवाद साधला.
यावेळी त्यांनी आठ दिवसात प्रश्न मार्गी न लावल्यास वेगळी भूमिका घेणार असल्याचे सांगितले. यावेळी राजेंद्र जाधव दिलीप नागापुरे .सीमा काळबांडे.शुभांगी कडूकार विलास आडे तथा असंख्य महिला भगिनी उपस्थित होत्या

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...