ऊमरीपठार वृध्दाश्रमात एस.पी.साहेब व दिवानी जिल्हा न्यायधिश यांचे ऊपस्थितीत ज्येष्ठ नागरिकदिन साजरा—
जेष्ठ निराधार वृध्दांची सेवा हे मौलिक कार्य—मा.कुमार चिंता ,जि.पोलीस अधिक्षक
*******************
आर्णी,
ऊमरीपठार येथील वृध्दाश्रम संत दोला महाराज येथे ज्येष्ठ नागरिकदिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमास जिल्हा पोलीस निरीक्षक मा.कुमार चिंता साहेब हे प्रामुख्याने ऊपस्थित होते. ते यावेळी मार्गदर्शन करतांना म्हणाले निराधार झालेल्या वृध्दांची देखभाल हे वृध्दाश्रम करीत असुन हे सेवा कार्य सामाजीक दृष्ठ्या अतिशय मौलीक असे आहे.या वृध्दाश्रमात पंचेवीस वृध्दांना शासनाची अनुदानित मंजुरी असतांना येथे १५८वृध्द वास्तव्यास असुन त्यांची सेवा केली जाते.मंजुरीपेक्षा जास्त वास्तव्य करीत असलेल्या वृध्दांना शासनाची मंजुरी मिळण्यासाठी जिल्हाधिकारी यांचेकडे मी विनंती करणार आहे असेही ते म्हणाले. जिल्हा न्यायालयाचे दिवानी न्यायधीश वरिष्ठ स्तर मा.के.ये.नाहार साहेब हे बोलतांना म्हणाले ज्येष्ठ नागरिकाच्या मुलांची आई वडीलांची जोपासना करणे हे मुलांचे कर्तव्य आहे.जे मुलं ज्येष्ठांची सेवा करीत नाहीत ते कारद्यानुसार गुन्हेगार ठरतात.अश्या मुलांची तक्रार म्हातारे थकलेले आईवडील करु शकतात.त्यांना कायद्याचे पाठबळ आहे.माजी जिल्हा ऊपशिक्षणाधीकारी व वृध्दाश्रमाचे संचालक मा.शंकररा डोंगरे यांनी वृध्दाश्रमातील ज्येष्ठ निराधार नागरिकांना जोपासण्यासाठी अनेकांचे मदतीचे हात लागलेले आहे.डोंगरे कुटुंबियांच्या सेवेला अनेकांनी हातभार लावून वृध्दांची सेवा वृध्दिंगत झाली.वृध्दाश्रमाचे संस्थापक मा.शेषराव डोंगरे यांनी विचार व्यक्त करतांना हा वृध्दाश्रम तेहतीस वर्षापुर्वी मा.ह.रा.कुळकर्णी माजी जिव्हाधिकारी यांचे प्रेरणेतुन व निराधार झालेल्या लोकांच्या समस्या पाहुन ऊदयास आला.हा वृध्दाश्रम बंद पडु नये यासाठी आठ एकर शेती व पत्निचे मंगळसुञ जोडवे पण विकावे लागले होते,अनेकांच्या सहकार्यातुन हा वटवृक्ष मला जोपासता आला.मी जेष्ठांच्या सेवेसाठी आयुष्य अर्पण केले. प्रास्ताविकात जयप्रकाश डोंगरे म्हणाले एस.पी.साहेब व न्यायधिश साहेबांची ऊपस्थिती ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्याला धीर देणारी आहे.ज्येष्ठ नागरिक आयुष्याच्या शेवटी निराधार होवु नये या ऊद्देशानेच हा वृध्दाश्रमाचा जन्म झाला.वृध्दांचा सन्मान झाला पाहीजे.वृध्दांची सेवा करतांना अनेक अनुभव आले.काही वृध्द रस्त्यावर पडुन असलेले आढळले.या वृध्दाश्रमात चाळीस वृध्द बेडवर पडुन राहणारे आहेत.त्यांना चालता येत नाही.सर्व विधी बेडवरच करतात.काही वृध्दांचे सडलेल्या पायांचे आॅपरेशन करुन आनले.वृध्दांचे आरोग्य जोपासणे हे फार महत्वाचे आहे.या सेवेत लोकसहभाग असणे महत्वाचे आहे.जेष्ठ नागरिकांच्या विव्हळणा-या हृदय हलवुन सोडणा-या व्यथा वेदना पाहुन मन सुन्न होतं.त्यांच्या डोळ्यातील आसवं आपणाकडे पाहतात.जयप्रकाशने प्रास्ताविकात अनुभव कथन केले.या प्रसंगी पोलीस पाटील मिर्जापुरे,प्रा.डाॅ,आबासाहेब कल्याणकर नांदेड,सुरेश तळमले,राजु जयस्वाल,वृध्द बांधव व परिसरातील बहूसंख्य नागरिक ऊपस्थित होते.
ऊमरीपठार वृध्दाश्रमात एस.पी.साहेब व दिवानी जिल्हा न्यायधिश यांचे ऊपस्थितीत ज्येष्ठ नागरिकदिन साजरा—
Bhagirath Raja 24 News.com
0


टिप्पणी पोस्ट करा