माहूर गडावर श्री रेणुका देवीची घटस्थापना....
माहूरगडावर उदे उदेचा गजर, शारदीय नवरात्र उत्सवास सुरुवात !
नवरात्र उत्सवाची तयारी पूर्ण; भाविकांच्या आगमनासाठी प्रशासन सज्ज!
नवरात्र उत्सवाला आजपासून प्रारंभ.
भगीरथ राजा 24 न्यूज मुख्य संपादक गणेश एकंडवार
महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठापैकी पूर्ण व मुळपीठ असलेल्या माहूर गडावर नवरात्र उत्सवास गुरुवार ता.३ ऑक्टोबर पासून घटस्थापना होऊन प्रारंभ होणार आहे. त्यामुळे सह्याद्रीच्या डोंगरात भक्तांचा महापूर व हाकेला ओ देणाऱ्या श्री रेणुकादेवीचा गजर भाविक नऊ दिवस करणार असून गडावर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे सर्वत्र वातावरण भक्तीमय झाले आहे.राज्यातील कानाकोपऱ्यापासून ते देशातील विविध राज्यातून लाखो भाविक श्री रेणुका देवीच्या दर्शनासाठी नवरात्र उत्सव पर्व काळात हजेरी लावत असतात.भाविकांच्या सोयी सुविधेच्या दृष्टिकोनातून श्री रेणुका देवी संस्थान व तसेच जिल्हा प्रशासनाने अचूक नियोजन पद्धतीने व्यवस्थापन केले असून माहूर गडावरील नियोजन व्यवस्थेचा आढावा घेतला असता जणू विश्वस्त मंडळ आणि प्रशासन भाविकांच्या आगमनासाठी सज्ज असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
◼️नवरात्री दरम्यान रेणुका आईला साकडे
श्रीक्षेत्र माहूर गडावरील वार्षिक उत्सवापैकी सर्वात मोठा उत्सव म्हणजे श्री रेणुका देवी चा नवरात्र उत्सव आहे.नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये लाखो भाविक श्री रेणुका मातेचा गजर करीत आपल्या कुलस्वामिनीचे विधीवत पूजा करून दर्शन घेत असतात व आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्याकरिता आईला साकडे घालतात.
श्री रेणुका देवी संस्थान मंदिर विश्वस्त समितीने शारदीय नवरात्र महोत्सवांमध्ये प्रतिपदा ते विजयादशमी पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमाचे तसेच संगीत सेवेचे आयोजन मोठ्या प्रमाणात केले आहे.
◼️धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन
रविवार ता.तीन ऑक्टोबर अश्विन शुद्ध प्रतिपदा सकाळी सात वाजता श्री रेणुका मातेच्या वैदिक महापुजेस प्रारंभ,वेदघोषांमध्ये श्री रेणुका देवीची घटस्थापना करण्यात येणार आहे.दुपारी साडेअकरा वाजता शतचंडी पाठ, चतुर्वेद पारायण,प्रारंभ छबिना,महाआरती व महाप्रसाद,ता.चार ऑक्टोबर ६ ऑक्टोबर रोजी श्री रेणुका देवीची नियमित महापूजा व महाआरती होणार आहे. ७ तारखेला ललिता पंचमीला श्री रेणुका देवीच्या जागरणास प्रारंभ होईल.गुरुवार १० ऑक्टोबर रोजी कुमारिका पूजन सुवासिनी पूजन तसेच महाकाली मातेची महापूजा आवाहन व हवनाचे निमंत्रण देण्यात येईल.त्या सोबतच शतचंडी महायज्ञाचे देवता स्थापन व हवनास प्रारंभ.शनिवारी ता.१२ ऑक्टोबर रोजी ध्वजपूजन श्री रेणुका देवी ची महापूजा महाआरती तसेच दुपारी चार वाजता शस्त्र पूजन श्री भगवान परशुरामाची पालखी,सिमोलघन व महाआरती.१६ ऑक्टोबर रोजी श्री रेणुका मातेच्या वैदिक महापुजेस प्रारंभ महाप्रसाद जागर मातेचा श्री मातेस दुग्ध नैवेद्य व महा आरती व दुग्धप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.
◼️नवरात्र महोत्सवातील संगीत सेवेचे कार्यक्रम
गडावरील मंदिरात गुरुवार (ता.तीन)ऑक्टोबर रोजी पं.श्री नितीन जयसिंग धुमाळ नाशिक यांचे प्रतिपदा ते दशमी पर्यंत सनईवादन,सौ महानंदा रमेश राठोड आणि समूह वाशिम, जनार्दन पंत लाडके गुरुजी नागपूर,अभिजीत रत्नाकर आपस्तंभ अहमदनगर यांचे (पारंपारिक व सांस्कृतिक गायन भक्ती संगीत सेवा),ता.४ ऑक्टोबर रोजी मा शारदा भजनी मंडळ अमरावती यांचे (भजन सेवा),कु.अदिती काटेकर स्वरकमल यांची (भक्ती संगीत सेवा),सौ.शिल्पा कुलकर्णी हैदराबाद (गायनसेवा),चंदन आडगावकर छत्रपती संभाजीनगर (गायन सेवा),वर्षा इंगोले यवतमाळ (गायनसेवा),ता.५ ऑक्टोबर रोजी जय दुर्गा भजनी मंडळ माहूरगड यांचे (भजन सेवा),सौ.वर्षा किरण जोशी छत्रपती संभाजी नगर (गायन सेवा),गणेश देशपांडे व अनिल गायकवाड छत्रपती संभाजीनगर (गायन सेवा),पद्मजा महिला भजनी मंडळ नांदेड (टिपरी नृत्यसेवा),कैलास द.कोल्हे नादब्रह्म संगीत विद्यालय बुलढाणा (भक्ती संगीत गायन सेवा).ता.६ ऑक्टोबर श्री.जगदंबा म्युझिकल ग्रुप पिसादेव छत्रपती संभाजीनगर (भजन सेवा) सौ.दीपिका जोशी दहिसर (गायन सेवा) श्री गणेश हाके,सौ.सरस्वती व कुमारी वीरा नरसी नायगाव जि.नांदेड (गायन सेवा) शांती भूषण व सौ.कल्याणी चारठाणकर छत्रपती संभाजीनगर (गायन सेवा) सौ.भक्ती उदय पांडव पुणे (नृत्य सेवा), सौ.भक्ती सुनील पवार जालना (गायन सेवा), अंबिका व श्री श्रीपाद लिंबेकर पुणे (गायन सेवा) ता.७ ऑक्टोबर- श्री रेणुका महिला भजनी मंडळ माहूर (भजन सेवा),आदिशक्ती महिला भजनी मंडळ पुसद (भजन), डॉ.प्रज्ञा देशपांडे पुणे (कीर्तन व गायन),सुरभी घोडेकर,बोडे व समूह पुणे (नृत्य सेवा),कु. कोनकाती इथिक्षा आदिलाबाद (नृत्य सेवा),श्री पंडित परळीकर परभणी (गायन सेवा),श्री पंकज शिरभाते व गुंजन शिरभाते नांदेड (गायन सेवा) श्री अमर खेडकर यवतमाळ (गायन सेवा), कु.रागेश्री जोशी नांदेड (गायन सेवा),श्री पंडित प्रसन्नजी जोशी,श्री राहुल मानेकर,श्री श्रीकांत पिसे नागपूर (गायन सेवा), श्री रवी सताफळे इतर कला समूह व महाआरती (गायन सेवा),ता.८ ऑक्टोबर सुवासिनी क्रिएटिव्ह ग्रुप नांदेड (नृत्य सेवा),श्री ओमप्रकाश गवई स्वरनिनाद संगीत विद्यालय पुसद (भक्ती गीत सेवा),सारिका पांडे व संच नांदेड (गायन सेवा) श्री गिरीश शेषराव दिक्षित छत्रपती संभाजीनगर (गायन सेवा), अनुराधा मनोज पांडे व श्री दत्तात्रय देशपांडे स्वरगंध संगीत मंच (भक्ती संगीत गायन सेवा), सौ.अनुजा महेंद्र गाडे (गायन सेवा), ता.९ बुधवार रोजी श्री गजानन महिला भजनी मंडळ पुसद (भजन सेवा),श्री अशितोष पाटील व निवेदिता जोशी नांदेड (गायन सेवा),सौ संगीता चौधरी पुणे (भक्ती संगीत गायन सेवा),केतकी कुलकर्णी वर्धा (गायन सेवा), ता.१० ऑक्टोबर सोमेश्वर भारुड मंडळ तरवडी जि.अहमदनगर (समाज प्रबोधन भारुड सेवा),श्रीकृष्ण राज लव्हेकर परभणी (गायन विष्णुदासाची कविता),ता.२८ ऑक्टोबर कोजागिरी पोर्णिमा योगिनी महिला भजनी मंडळ लातूर (भजन सेवा),मैत्रेय बापट पुणे, लासा नृत्यलय पुणे (नृत्य सेवा),सौ.स्नेहा भाले छत्रपती संभाजी नगर (महाभारतातील महानायका),संजय कोरटकर,भाग्यश्री टिकले व सारंग कोरटकर पुसद यांच्या गायन सेवा सेवेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
◼️विश्वस्त मंडळाकडून आवाहन
नवरात्र महोत्सवातील सर्व धार्मिक कार्यक्रम व संगीत सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा श्री रेणुका देवी संस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष श्रीमती सुरेखा कोसमकर,सचिव तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली,उपाध्यक्ष तथा उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणे,कोषाध्यक्ष तथा तहसीलदार किशोर यादव,विश्वस्त विनायक फांदाडे,विश्वस्त चंद्रकांत भोपी,विश्वस्त संजय काण्णव,विश्वस्त आशिष जोशी, विश्वस्त बालाजी जगत,विश्वस्त दुर्गादास भोपी,विश्वस्त अरविंद देव यांनी केले आहे.
◼️सप्तमीला देवीच्या मंदिरासमोरील किल्ल्यामध्ये महाकालीच्या मंदिरात महाकाली मातेचे पूजन करून अष्टमीच्या हवानाची परवानगी मागितली जाते,आणि त्यानंतर कुमारीका पूजनाचा एक सामूहिक असा मोठा कार्यक्रम कार्यक्रम संपन्न होतो, परिसरामध्ये जेवढ्या कुमारी का असतील त्या सगळ्या कुमारीकांचं या ठिकाणी पूजन केलं जातं, आणि सप्तमीचा कार्यक्रम संपन्न होतो, परंतु यावर्षी सप्तमी आणि अष्टमी एकत्र आल्यामुळे होम हवन आला सुद्धा त्याच दिवशी सुरुवात होणार आहे. आणि होम हवन संपन्न झाल्यानंतर रात्री साधारणतः १२ ते १ वाजताच्या दरम्यान महाआरती होऊन पूर्णाआहुतीसाठी दुसऱ्या दिवशी पूर्णाआहुती ची तयारी केली जाते.
चंद्रकांत भोपी,
विश्वस्त तथा मुख्य पुजारी,
रेणुका देवी संस्थान,माहूर.
माहूर गडावर श्री रेणुका देवीची घटस्थापना....
Bhagirath Raja 24 News.com
0


إرسال تعليق