⚡ ब्रेकिंग News

आर्णी केळापूर विधानसभा शिवसेनेला सुटणार ? डॉ विष्णू उकंडे यांना संधी मिळण्याची शक्यता आर्णी गणेश एकंडवार

आर्णी केळापूर विधानसभा शिवसेनेला सुटणार ? डॉ विष्णू उकंडे यांना संधी मिळण्याची शक्यता
आर्णी गणेश एकंडवार आर्णी केळापूर विधानसभा हा अनुसूचित जमाती साठी राखीव असून यामध्ये आर्णी, घाटंजी, केळापूर तालुक्याचा समावेश होतो. आर्णी तालुक्यातील चार जिल्हा परिषद सर्कल तर घाटंजी तालुक्यातील तीन जिल्हा परिषद सर्कल केळापूर तालुक्यातील दोन जिल्हा परिषद सर्कल तथा इतर काही गावे व आर्णी घाटंजी पांढरकवडा शहराचा समावेश होतो. मतदानाच्या दृष्टिकोनातून सर्वाधिक मतदान आर्णी तालुक्यात असून सर्वात कमी केळापूर तालुक्यात मतदान आहे.सदर मतदारसंघावर शिवसेनेने दावा केला असून शिवसेनेचे संपर्कप्रमुख हरिहर लिंगणवार तथा जिल्हाप्रमुख श्रीधर मोहोड यांनी नामदार संजय राठोड तथा शिवसेना सचिव संजय मोरे यांच्याकडे आर्णी केळापूर विधानसभा शिवसेनेकडे देण्याची मागणी केली आहे.या संदर्भात नामदार संजय राठोड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आर्णी केळापूर विधानसभा शिवसेनेकडे देण्यासंदर्भात मागणी केल्याचे समजते

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...