⚡ ब्रेकिंग News

तुला चांगल्या गुणांनी पास करून देईल तू माझ्याशी बोलत का नाही? विद्यार्थिनीला वर्ग शिक्षकाचे असशील मेसेज*

*तुला चांगल्या गुणांनी पास करून देईल, तू मला आवडतेस तू माझ्याशी बोलत का नाही? विद्यार्थिनीला वर्ग शिक्षकाचे असशील मेसेज*
45 वर्षीय वर्गशिक्षक इयत्ता दहावी मध्ये शिकत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीला माझी बोर्डात ओळख असून तुला चांगल्या गुणांनी पास करून देणार. तू माझ्याशी बोलत जा असे मेसेज तो व्हाट्सअप वर रात्री अपरात्री करायचा याबाबत विद्यार्थिनींच्या तक्रारीवरून शिक्षकाविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना भंडारा जिल्ह्यात घडली. ही घटना भंडारा जिल्ह्यात पवनी शहरातील वैनगंगा विद्यालयात घडली या शाळेत दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचे शिक्षक भोजराज दिघोरे याने व्हाट्सॲप ग्रुप वरून तिचा मोबाईल क्रमांक घेतला. यानंतर तो तिला रात्री अपरात्री व्हाट्सॲप वर मेसेज पाठवू लागला. आपली बोर्डात चांगली ओळख असून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण करून देतो असे म्हणत तु माझ्याशी बोलत का नाही? तू मला आवडते, अशा प्रकारचे लज्जास्पद मेसेज हा शिक्षक विद्यार्थिनीच्या व्हाट्सॲपवर करीत होता. हा गंभीर प्रकार लक्षात आल्यावर विद्यार्थिनींनी शिक्षकाच्या मेसेजवर प्रतिसाद देत नसायची. हे बघून त्या शिक्षकाने तिच्या मैत्रिणीशी संपर्क साधून तिच्या माध्यमातून तिला मेसेज देण्याचाही प्रयत्न केला. शेवटी कंटाळून या विद्यार्थिनींने यासंदर्भात आपल्या पालकांकडे तक्रार केली, विद्यार्थिनीच्या पालकांनी पवनी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली असून पवनी पोलिसांनी भोजराज दिघोरे वय 45 वर्ष. या वर्गशिक्षका विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला असून शिक्षकाला अटक केली आहे.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...