उमेद ला स्वतंत्र कायमस्वरूपी दर्जा देण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणार - डॉ विष्णू उकंडे
आर्णी येथे उमेद चे तालुकास्तरीय अधिवेशन व जनजागृती मेळावा संपन्न
आर्णी : ग्रामीण भागातील महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी उमेद सतत कार्यरत आहे.
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान स्वतंत्र कायमस्वरूपी विभाग म्हणून आस्थापना मान्यता देऊन सर्व कार्यरत कंत्राटी अधिकारी कर्मचारी यांना शासनाच्या समकक्ष पदावर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करण्याच्या मागणी करिता आर्णी तालुक्यात तालुकास्तरीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते.
ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचून त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या महिला भगिनी ला अगदी तुटपुंज्या मानधनात सेवा द्यावी लागते.
आणि भविष्याची कोणतीही सुरक्षितता नसल्याने उमेद च्या भगिनी त्यांना कायम स्वरुपी स्वतंत्र्य विभागाची मागणी करत आहे.
सदर कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून डॉ विष्णू उकंडे यांना निमंत्रित केले असता.
त्यांनी महिलांच्या व्यथा समजून घेतल्या व उमेद ला स्वतंत्र्य दर्जा मिळून देण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणार असल्याचे सांगून इतर प्रत्येक गावात कार्यालय तथा तालुकास्तरावर भव्य कार्यालय देण्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तथा पालकमंत्री ना संजय राठोड यांना भेटून निवेदन देणार असल्याचे सांगितले.
यावेळी अध्यक्ष स्थानी आर्णी तालुका अध्यक्ष ज्योती ताई निंबाळकर तर नितीन पुरी.हेमंत वरखडे विनोद राठोड.संतोष जिरे.गोवर्धन पवार. प्रिया ठवकर.नवनीत राठोड व समस्त उमेद च्या महिला भगिनी व कर्मचारी उपस्थित होते
उमेद ला स्वतंत्र कायमस्वरूपी दर्जा देण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणार - डॉ विष्णू उकंडे
Bhagirath Raja 24 News.com
0




टिप्पणी पोस्ट करा