उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळणार

उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळणार

Ø इतर मागास बहुजन कल्याण विभागाने मागवले प्रस्ताव

Ø 21 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन



 महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध राज्यस्तरीय पुरस्कारांसाठी पात्र व्यक्ती व संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. यामध्ये महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार, नटराज पुरस्कार, विश्वकर्मा पुरस्कार आणि क्रांतीवीर राजे उमाजी नाईक पुरस्कारांचा समावेश असून, इच्छुकांनी 21 फेब्रुवारी 2026 पर्यंत आपले प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक संचालक ओमप्रकाश नगराळे यांनी केले आहे.



 प्रस्तावासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे, कार्याचा सविस्तर अहवाल, शिफारस पत्रे व प्रमाणपत्रे जोडणे आवश्यक असून या पुरस्कारांसाठी अर्जदार व्यक्ती किंवा संस्था महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदाराने संबंधित समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक अथवा अन्य क्षेत्रातील उत्थानासाठी सलग आणि उल्लेखनीय स्वरूपाचे कार्य केलेले असावे. पुरस्कारासाठीचा अर्ज विहित नमुन्यात सादर करणे बंधनकारक असून, अपूर्ण चुकीची माहिती असलेले किंवा मुदतीनंतर प्राप्त होणारे प्रस्ताव कोणत्याही परिस्थितीत विचारात घेतले जाणार नाहीत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.



 पुरस्कारांबाबतचा अंतिम निर्णय शासन स्तरावर घेण्यात येईल व त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही. पात्र व इच्छुक व्यक्तींनी आपले प्रस्ताव 21 फेब्रुवारीपर्यंत कार्यालयीन वेळेत सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, यवतमाळ यांच्या कार्यालयात सादर करावेत. अर्जाचा नमुना आणि सविस्तर अटी व शर्तींची माहिती जिल्हा कार्यालयात उपलब्ध आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र उमेदवारांनी आपले प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक संचालक ओमप्रकाश नगराळे यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...