वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर हटकर अडचणीत राज्य माहिती आयोगाचा कडक इशारा

वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर हटकर अडचणीत राज्य माहिती आयोगाचा कडक इशारा माहिती दडवली का? द्वितीय अपीलावर 25 फेब्रुवारीला         निर्णायक सुनावणी

 गैरहजेरीत एकतर्फी आदेशाची शक्यता



 मारेगाव:

माहितीचा अधिकार कायद्यांतर्गत मागविलेली माहिती न दिल्याच्या आरोपावरून शंकर हटकर, वनपरिक्षेत्र अधिकारी मारेगाव यांच्याविरुद्ध प्रकरण थेट राज्य माहिती आयोग, अमरावती खंडपीठापर्यंत पोहोचले आहे. आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधितांना कडक शब्दांत सुनावणीची नोटीस बजावली आहे.अर्जदार सचिन पांडुरंग मेश्राम यांनी वन विभागाकडे मागितलेल्या माहितीसंदर्भात समाधानकारक उत्तर न मिळाल्याचा आरोप करत प्रथम अपील दाखल केले होते. मात्र त्यानंतरही माहिती न मिळाल्याने अखेर द्वितीय अपील दाखल करण्यात आले. आता आयोगाने थेट सुनावणी निश्चित करत वन विभागाला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. २५ फेब्रुवारीला निर्णायक क्षण आयोगाने स्पष्ट केले आहे. 


 की,
माहिती अर्जापासून आजपर्यंतची संपूर्ण कार्यवाही सादर करावी,माहिती दिल्याचे ठोस पुरावे दाखल करावेत.अपूर्ण किंवा दिशाभूल करणारी माहिती नसल्याचे शपथपत्र द्यावे,प्रथम अपीलवरील आदेशाची कारणमीमांसा सादर करावी.

सदर सुनावणी २५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता होणार असून, अनुपस्थित राहिल्यास किंवा समाधानकारक स्पष्टीकरण न दिल्यास आयोग एकतर्फी निर्णय देऊ शकतो, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

*वन विभागात खळबळ* माहिती अधिकाराच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे हे प्रकरण आता निर्णायक टप्प्यावर आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...