अंतुर्ली येथे 2 एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव व भव्य हिंदू संमेलनाचे आयोजन*

 *अंतुर्ली येथे 2 एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव व भव्य हिंदू संमेलनाचे आयोजन*

अंतुर्ली तालुका- मुक्ताईनगर प्रतिनिधी किरण पाटील

मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथे 2 एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव व भव्य हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे .या हनुमान जन्मोत्सव व भव्य हिंदू संमेलनाचे आयोजन सकल हिंदू समाज अंतुर्ली मंडळ यांनी केले आहे या कार्यक्रमानिमित्त शोभायात्रा निघणार आह. या कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे आहे 2 एप्रिल 2026 रोज गुरुवारी संध्याकाळी 5 ते 6.30 पर्यंत राम मंदिर ते संमेलना स्थळापर्यंत शोभायात्रा निघेल


तर भव्य हिंदू संमेलन संध्याकाळी 6.30 ते 8.30 पर्यंत राहील या भव्य हिंदू संमेलनाचे स्थळ छत्रपती शिवाजी महाराज नगर अंतुर्ली हे आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री दत्त मंदिर संस्थान गिरणारी मठ भुसावळचे स्वामी ब्रह्मानंदजी, भागवत भूषण श्री कन्हैयाजी महाराज ब्रह्मपूरवाले, श्री संत मुक्ताई संस्थान मुक्ताईनगरचे श्री रवींद्र महाराज हरणे व भुसावळ जिल्हा महामार्ग प्रमुख राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री योगेश अनंतराव नेटके हे आहे. या हनुमान जन्मोत्सव व भव्य हिंदू संमेलनात सर्व हिंदू बांधव भगिनी,तरुण वर्ग व अबाल वृदध यांनी उपस्थित राहावे असे आवाहन सकल हिंदू समाज अंतुर्ली मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...