शेतातील कुटाराच्या ढिगाला आग लावून नुकसान; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

  शेतातील कुटाराच्या ढिगाला आग लावून नुकसान; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल



आर्णी (प्रतिनिधी) : तालुक्यातील शारी गावात शेतातील कुटाराच्या ढिगाला आग लावून नुकसान केल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी दोन जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अपराध क्रमांक 274/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 326(F), 3(5) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणात फिर्यादी हिरासिंग पांडू चव्हाण (वय 56, रा. शारी, ता. आर्णी, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी वामन पांडू चव्हाण (वय 58) व नितीन वामन चव्हाण (वय 35, दोघे रा. शारी) यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.



फिर्यादी यांच्या जबानीनुसार, दि. 22 मार्च रोजी सकाळी सुमारे 7 वाजता ते आपल्या पत्नीसह शेतात गेले असता त्यांच्या शेतातील ताडपत्रीने झाकून ठेवलेल्या कुटाराच्या ढिगाला अज्ञात व्यक्तींनी आग लावल्याचे आढळून आले. या घटनेत अंदाजे 25 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.



याबाबत त्यांनी मुलगा वैभव याच्याकडे विचारणा केली असता, त्याने दि. 21 मार्च रोजी रात्री सुमारे 8.30 वाजण्याच्या सुमारास गावातील चौफुलीवर उभा असताना आरोपी वामन व नितीन हे दोघे घाईगडबडीने शेताच्या दिशेने जाताना पाहिल्याचे सांगितले. तसेच, आरोपींनी यापूर्वी नुकसान करण्याच्या धमक्या दिल्याचेही फिर्यादी यांनी नमूद केले आहे.या सर्व बाबींचा विचार करून संबंधित दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल संजय चव्हाण करीत आहेत.


पोलीसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारच्या घटनांची तात्काळ माहिती पोलीसांना द्यावी, जेणेकरून वेळीच कारवाई करता येईल.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...