जवळा येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान व समाधान शिबीर’ संदर्भात आढावा बैठक

 जवळा येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान व समाधान शिबीर’ संदर्भात आढावा बैठक




ग्रामपंचायत जवळा येथे दिनांक 06 मार्च 2026 रोजी दुपारी 4 वाजता ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान व समाधान शिबीर अनुषंगाने आढावा बैठक पार पडली. ही बैठक तहसीलदार आर्णी मा. श्री. वैशाख वाहुरवाघ व निवासी नायब तहसीलदार मा. श्री. उदय तुंडलवार यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली.



या बैठकीला जवळा मंडळातील ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी, पशुसंवर्धन अधिकारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, महसूल सेवक तसेच टपाल विभागाचे कर्मचारी यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.



दिनांक 14 मार्च 2026 रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान व समाधान शिबीरात महसूल व इतर विभागांच्या 15 पेक्षा अधिक सेवा नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या शिबिरामध्ये प्रलंबित फेरफार प्रकरणे, 7/12 उताऱ्यातील चुका दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीयुक्त 7/12 व 8अ उताऱ्यांचे वाटप, उत्पन्न, रहिवासी व जात प्रमाणपत्र, नॉन-क्रिमिलिअर प्रमाणपत्र, अकृषक (एन.ए.) परवानगी, अकृषिक तरतुदींविषयी मार्गदर्शन, नवीन व्यवस्थेनुसार सनद प्रक्रियेची माहिती, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचा लाभ मंजुरी, विद्यार्थ्यांसाठी विविध दाखल्यांचे वाटप, अ‍ॅग्री स्टॅक व प्रधानमंत्री किसान योजनेची माहिती तसेच वारस फेरफार आदी सेवांचा समावेश आहे.



या शिबिरामधून नागरिकांच्या तक्रारींचे तत्काळ निराकरण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत नागरिकांना शासकीय कार्यालयांच्या वारंवार फेऱ्या माराव्या लागू नयेत, यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे तहसीलदार वैशाख वाहुरवाघ यांनी सांगितले. तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले.या आढावा बैठकीस मंडळ अधिकारी एस. एस. रोहणकर, डी. व्ही. मिठे, सी. जे. पांडे, व्ही. ए. शेख, आर. एल. गोखे, विजय ढेकाळे, पी. एस. राऊत (ग्राम महसूल अधिकारी) तसेच विविध विभागांचे कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...